शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

...अन् तो फलक पुन्हा सन्मानाने उभा राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 12:30 PM

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. २३ - १२ जुलै २०१४, ही तारीख आहे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर खान्देशकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा नामफलक लावून विद्यापीठाचे प्रतिकात्मक नामकरण करण्याची. हा फलक काढण्यात आला तरी आता तीन वर्षे, ८ महिने, १० दिवसांनी अखेर हेच नाव विद्यापीठाला मिळाले आणि हा फलक पुन्हा उभा राहण्याची अपेक्षा ...

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. २३ - १२ जुलै २०१४, ही तारीख आहे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर खान्देशकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा नामफलक लावून विद्यापीठाचे प्रतिकात्मक नामकरण करण्याची. हा फलक काढण्यात आला तरी आता तीन वर्षे, ८ महिने, १० दिवसांनी अखेर हेच नाव विद्यापीठाला मिळाले आणि हा फलक पुन्हा उभा राहण्याची अपेक्षा पूर्ती आता पुन्हा होणार आहे.उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्यात यावे या मागणीसाठी लढा सुरू असताना १२ जुलै २०१४ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव असलेला फलक लावला. हा फलक काढण्यासाठी त्यांना सांगण्यातही आले. मात्र आपले आंदोलन सुरूच ठेवत प्रवेशद्वारासमोर उपोषण, भजन करीत कार्यकर्ते मागणीवर ठाम राहिले. यात विनोद देशमुख, मिलिंद सोनवणे, युगल जैन, मंगल पाटील, यशवंत पाटील, संजय राणा, मनिषा देशमुख, बापू देशमुख, प्रतिभा देशमुख, राजेंद्र देसले आदी सहभागी झाले होते.हा फलक तेथून काढून प्रवेशद्वाराच्या बाजूला ठेवण्यात आला होता. तेथून तो फलक नेण्याबाबत विद्यापीठाच्यावतीने कार्यकर्त्यांना कळविण्यातही आले. मात्र त्यांनी त्या वेळी सांगितले होते, ‘हा फलक तेथेच राहू द्या, एक दिवस तो सन्मानाने तेथे उभा राहील....’. आणि आता हा फलक तेथे उभा राहण्याचा मार्ग मोकळा झाला असून शुक्रवारी हेच पदाधिकारी, कार्यकर्ते तेथे जाऊन हा फलक उभा करणार आहे.

टॅग्स :Jalgaonजळगावuniversityविद्यापीठ