महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना भुसावळमध्ये दाखवले काळे झेंडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2018 13:57 IST2018-10-01T13:44:55+5:302018-10-01T13:57:55+5:30
राज्याचे महसूलमंत्री आणि जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना भारिपतर्फे काळे झेंडे दाखविण्यात आले.

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना भुसावळमध्ये दाखवले काळे झेंडे
जळगाव : राज्याचे महसूलमंत्री आणि जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना भारिपतर्फे काळे झेंडे दाखविण्यात आले. तसेच त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. भुसावळमध्ये सोमवारी (1 ऑक्टोबर) सकाळी हा प्रकार घडला.
फैजपूर (ता. यावल) येथे आयोजित अटल महाकृषी कार्यशाळेसाठी पाटील जात असताना भारिपतर्फे पाटील यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. जिल्ह्यातील विकास कामे होत नसल्याच्या निषेधार्थ काळे झेंडे दाखविण्यात आले. पाटील हे न्याय देत नसल्याने त्यांनी पालकमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली. यावेळी आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.