भाजप कार्यकर्त्यांकडून ठाकरे सरकारच्या विजयाच्या घोषणा!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2020 04:04 AM2020-05-23T04:04:50+5:302020-05-23T04:05:16+5:30

विधानपरिषद निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज असलेले माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी स्नुषा खासदार रक्षा खडसे यांच्यासमवेत मुक्ताईनगर येथे आंदोलन केले.

BJP workers announce victory of Thackeray government! | भाजप कार्यकर्त्यांकडून ठाकरे सरकारच्या विजयाच्या घोषणा!

भाजप कार्यकर्त्यांकडून ठाकरे सरकारच्या विजयाच्या घोषणा!

Next

जळगाव : भाजपकडून ‘माझे अंगण, माझे रणांगण’ अंतर्गत शुक्रवारी राज्य सरकारच्या निषेधाचा कार्यक्रम घेण्यात आला. माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या जामनेर येथील निवासस्थानासमोर झालेल्या या आंदोलनाप्रसंगी प्रसंगी महाजन
यांनी ‘ठाकरे सरकारचा....’ असे म्हणताच कार्यकर्त्यांमधून ‘विजय असो ...!’ अशी घोषणा दिली. या कार्यक्रमाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
महाजन यांनी एकदा नव्हे तर दोनदा ‘ठाकरे सरकारचा....’ असे म्हणताच कार्यकर्त्यांकडून ‘विजय असो !’ अशी घोषणा देत असल्याचे व्हिडीओत दिसत आहे. यानंतर महाजन यांनी महाविकास आघाडीचा असे म्हणताच निषेध असो अशी घोषणा कार्यकर्ते देत असल्याचे दिसते.
दरम्यान, विधानपरिषद निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज असलेले माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी स्नुषा खासदार रक्षा खडसे यांच्यासमवेत मुक्ताईनगर येथे आंदोलन केले. आपली नाराजी पक्षावर नसून ती विशिष्ट व्यक्तींवर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कोरोना स्थिती हाताळण्यात राज्य शासन पूर्णत:अपयशी ठरल्याने त्यांचा निषेध केला. कार्यकर्त्यांनी निषेधाच्याच घोषणा दिल्या, विजयाची घोषणा दिली नाही. कुणीतरी व्हिडीओत तोडमोड करुन प्रसारित केल्याचे दिसते.
-गिरीश महाजन, माजी
मंत्री, आमदार

Web Title: BJP workers announce victory of Thackeray government!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.