भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे जळगावमध्ये आज मुक्कामी येणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2023 18:01 IST2023-04-09T18:00:23+5:302023-04-09T18:01:20+5:30
मंगळवारी वसंत-स्मृति या भाजप कार्यालयाला बावनकुळे भेट देतील.

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे जळगावमध्ये आज मुक्कामी येणार
कुंदन पाटील
जळगाव : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सोमवारी रात्री येथे मुक्कामी येणार आहे. मंगळवारी ते विविध बैठका घेणार असून काही शाखांचे उद्घाटन करणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे यांनी दिली. बावनकुळे हे सोमवारी दिवसभर जळगावात बैठका घेणार होते. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह सत्ताधारी आमदार अयोध्या दौऱ्यावर गेले आहेत. तर बावनकुळे हे सोमवारी सकाळी नगरहून येणार होते. मात्र दौऱ्यात बदल झाल्याने आता ते सोमवारी सायंकाळी जळगावात येणार आहे.
मंगळवारी वसंत-स्मृति या भाजप कार्यालयाला बावनकुळे भेट देतील. त्यानंतर काही जणांच्या ते खासगी भेटीही घेणार आहेत. तर त्यांच्या उपस्थितीत काही जणांचा पक्षप्रवेशही होणार आहे. दरम्यान बावनकुळे हे भाजप कार्यकर्त्याकडे मुक्कामाला थांबणार आहेत. ते नेमके कुणाकडे थांबणार, याविषयी मात्र माहिती देण्यात आलेली नाही. तर अन्य पदाधिकारी शासकीय विश्रामगृहावर थांबतील, असे भोळे यांनी सांगितले.