भाजपा लोकप्रतिनिधीची अश्लील क्लीप व्हायरल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 07:19 IST2019-02-20T07:19:37+5:302019-02-20T07:19:57+5:30
चर्चांना ऊत; जळगावात राजकीय भूकंप

भाजपा लोकप्रतिनिधीची अश्लील क्लीप व्हायरल
जळगाव : जिल्ह्यातील भाजपाच्या एका लोकप्रतिनिधीची महिलेसोबतची आक्षेपार्ह अवस्थेतील क्लीप मंगळवारी व्हायरल झाल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. मात्र यासंदर्भात सायबर सेलकडे अद्याप कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही.
क्लीपमध्ये या लोकप्रतिनिधी समवेत एक महिला दिसून येत आहे. एखाद्या बंदिस्त आणि अलिशान बंगल्यात किंवा बड्या हॉटेलमध्ये हे चित्रण करण्यात आल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, ही क्लीप खरी की खोटी, याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील सायबर सेलशी संपर्क साधला असता, तशी कोणतीही तक्रार अद्याप आली नसल्याचे या विभागाच्या सूत्रांनी सांगितले.