भुसावळात गँगवार, भाजप नगरसेवकासह कुटुंबातील चार जण ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2019 12:02 AM2019-10-07T00:02:46+5:302019-10-07T06:29:52+5:30

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले सह भुसावळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

BJP corporator with four family member killed in Bhusawal | भुसावळात गँगवार, भाजप नगरसेवकासह कुटुंबातील चार जण ठार

भुसावळात गँगवार, भाजप नगरसेवकासह कुटुंबातील चार जण ठार

googlenewsNext

भुसावळ (जि.जळगाव) : येथील भाजप नगरसेवक रवींद्र खरात यांच्या कुटुंबावर त्यांच्या निवासस्थानी अज्ञातांकडून करण्यात आलेल्या प्राणघातक हल्ल्यात दोन जणांचा जागीच तर अन्य दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री पावणे दहा वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत चार जण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान हल्लेखोर कोण आहेत, हे मात्र अजून समजू शकलेले नाहीत.

रवींद्र खरात उर्फ हंप्या यांच्या कुटुंबावर आज रात्री पावणेदहाच्या सुमारास अज्ञात व्यक्तींकडून गोळीबार करण्यात आला. हल्लेखोरांनी त्यांच्या अंगणात येऊन अंदाधुंद गोळीबार केला. यात त्यांचे बंधू भाऊ सुनील बाबूराव खरात (५५) व स्वत: रवींद्र बाबूराव खरात (५०), मुलगा सागर रवींद्र खरात (२४), रोहित उर्फ सोनू रवींद्र खरात (२०) ठार झाले आहेत. गोळीबारानंतर जखमी रवींद्र खरात यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र या ठिकाणी डॉक्टरांनी मयत घोषित केले. या घटनेत त्यांची पत्नी रजनी खरात, दुसरा मुलगा रितेश याच्यासह अन्य एक असे चार जण गंभीर जखमी आहे.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले सह भुसावळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी सर्वत्र रक्ताचा सडा पडलेला होता. गोळीबाराच्या आवाजाने परिसरातील नागरिकांनी एकच धावपळ केली. या प्रकरणातील रवींद्र खरात याच्यावर पूर्वी काही गुन्हे आहेत. त्याच्यावर पोलिसांनी एमपीडीएची कारवाई देखील झालेली होती.

राज अख्तर खान व राजा मोघे, मयुर सुरवाडे या तिघांसह चौघांनी हल्ला केल्याचे रवींद्र खरात यांचा मुलगा रितेश याने पोलिसांना सांगितले. दरम्यान, पोलिसांनी तीन आरोपीना ताब्यात घेतले असून ते देखील जखमी झाले आहेत. 

Web Title: BJP corporator with four family member killed in Bhusawal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.