दुचाकीस्वार ‘डीपी’वर धडकला क्षणात जीव गेला, २ मुलं पोरके
By विलास बारी | Updated: March 10, 2024 19:57 IST2024-03-10T19:57:21+5:302024-03-10T19:57:40+5:30
शिरसोली रस्त्यावर नेहरु नगर परिसरातील घटना

दुचाकीस्वार ‘डीपी’वर धडकला क्षणात जीव गेला, २ मुलं पोरके
विलास बारी/ जळगाव : किराणा साहित्य घेऊन शिरसोली येथे घरी परतत असताना दुचाकी विद्युत डीपीवर धडकल्याने कबीर भिका चव्हाण (४४, रा. शिरसोली) हे ठार झाले. हा अपघातजळगाव ते शिरसोली रस्त्यावर नेहरु नगर परिसरात रविवार, १० मार्च रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास झाला.
जैन व्हॅली कंपनीमध्ये कामाला असलेले कबीर चव्हाण रविवारी जळगावहून किराणा साहित्य घेऊन दुचाकीने शिरसोली येथे घरी निघाले होते. नेहरु नगर परिसरात त्यांची दुचाकी (एमएच १९ सीएम ९१५१) विद्युत डीपीला धडकली.
यात त्यांना जबर दुखापत झाली. आजूबाजूच्या नागरिकांनी त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले. मयताच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, भाऊ असा परिवार आहे.