दुचाकीस्वारास भरधाव ट्रकने चिरडले; वडिलांचा मृत्यू, मुलगी गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2022 15:28 IST2022-12-31T15:26:09+5:302022-12-31T15:28:46+5:30
राजू दीपक कोळी (४५, रा. चारठाणा, ता. मुक्ताईनगर) हे शनिवारी दुपारी दुचाकीने भडगावकडे निघाले होते

दुचाकीस्वारास भरधाव ट्रकने चिरडले; वडिलांचा मृत्यू, मुलगी गंभीर जखमी
जळगाव : जळगावकडून भडगावकडे जाणाऱ्या ४५ वर्षीय दुचाकीस्वार प्रौढाला भरधाव ट्रकने रामदेववाडी गावाजवळ चिरडले. या अपघातात दुचाकीस्वार प्रौढाचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून मुलगी गंभीर जखमी झाली आहे. हा अपघात शनिवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास झाला.
राजू दीपक कोळी (४५, रा. चारठाणा, ता. मुक्ताईनगर) हे शनिवारी दुपारी दुचाकीने भडगावकडे निघाले होते. मुलगी सोनी ही त्यांच्यासोबत होती. रामदेववाडी गावाजवळून दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास जात असताना त्यांच्या दुचाकीला भरधाव ट्रकने धडक दिली. यात ट्रकचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर मुलगी सोनी हिच्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांना ग्रामस्थांनी लागलीच रूग्णालयात हलविले. जखमी मुलीवर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहे.