भडगाव पालिकेमार्फत सायकल रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 15:39 IST2020-12-25T15:38:20+5:302020-12-25T15:39:23+5:30
‘माझी वसुंधरा अभियान व स्वछ सर्वेक्षण २०२१’ अंतर्गत येथील पालिकेतर्फे ‘ नो व्हेईकल डे’ अनुषंगानेशहरात सायकल रॅली काढण्यात आली.

भडगाव पालिकेमार्फत सायकल रॅली
भडगाव : ‘माझी वसुंधरा अभियान व स्वछ सर्वेक्षण २०२१’ अंतर्गत येथील पालिकेतर्फे ‘ नो व्हेईकल डे’ अनुषंगाने २३ रोजी शहरात सायकल रॅली काढण्यात आली.
पालिका कार्यालयापासून मेन रोड, मार्गे बस स्थानक, पारोळा चौफुलीवरून टोणगाव मार्गे खोल गल्लीवरून ते पालिका कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली.
दर बुधवारी पालिका कर्मचारी हे स्वयंचलीत वाहन वापर करणार नाहीत. या कार्यक्रमास मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पाणीपुरवठा स्वच्छता अभियंता गणेश लाड, शहर अभियंता रणजित पाटील, अजय लोखंडे विशाल महाजन, कमलाकर देशमुख, शहर समनव्यक स्वप्नील सोळंके, कल्याण देशमुख, समसुद्दीन शेख, सुनील पवार, दिलीप कोळी, सुरेश पाटील, विजय कंडारे व इतर कर्मचारी उपस्थित होते.
तसेच शहरातील सर्व नागरिकांनी आठवड्यातील एक दिवस नो व्हेईकल डे पाळावा, असे आवाहन मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी केले आहे.