भुसावळात गावठी कट्ट्यासह एक ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 15:54 IST2020-07-06T15:53:57+5:302020-07-06T15:54:29+5:30
वांजोळा रोडवर गावठी कट्ट्यासह एकास बाजारपेठ पोलिसांनी अटक केली.

भुसावळात गावठी कट्ट्यासह एक ताब्यात
भुसावळ : शहरातील वांजोळा रोडवर गावठी कट्ट्यासह एकास बाजारपेठ पोलिसांनी अटक केली. ५ रोजी रात्री साडेअकराला ही कारवाई करण्यात आली.
वांजोळा रोडवर चंद्रकांत विनोद घेगट (१९) याच्याकडे गावठी कट्टा असल्याची माहिती बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिलीप भागवत यांना मिळाली. त्यांनी डीवायएसपी गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि संदीप परदेशी, रवींद्र बिºहाडे, रमण सुरळकर, महेश चौधरी, नेव्हील बाटली, तुषार पाटील, उमाकांत पाटील, बंटी कापडणे, विकास सातदिवे, कृष्णा देशमुख, प्रशांत परदेशी, ईश्वर भालेराव, चेतन ढाकणे आदींचे पथक पाठवून सापळा रचला व त्यास ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्या कमरेला खोचलेला १० हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा व ५०० रुपये किमतीचे एक जिवंत काडतुस हस्तगत केले. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पो.हे.कॉ.सुनील जोशी तपास करीत आहे