भुसावळला पुन्हा गावठी कट्टा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 18:18 IST2019-12-11T18:15:17+5:302019-12-11T18:18:20+5:30
भुसावळ शहरात जुनी नगरपालिकेच्या बाजूला हॉटेल पंचाली समोरील रस्त्यावर बुधवारी सार्वजनिक जागी सईद शेख अमीर शेख (वय २८) रा. पापानगर हा बेकायदेशिरपणे गावठी कट्टा घेऊन फिरत असताना पोलिसांनी त्याला अटक केली. यावेळी त्याकडून पोलिसांनी एक गावठी कट्टा जप्त केला आहे. याबाबत बाजारपेठ पोलिस ठाण्यात आर्म अॅक्ट नुसार गुन्हा दाखल झाला आहे.

भुसावळला पुन्हा गावठी कट्टा जप्त
भुसावळ : शहरात जुनी नगरपालिकेच्या बाजूला हॉटेल पंचाली समोरील रस्त्यावर बुधवारी सार्वजनिक जागी सईद शेख अमीर शेख (वय २८) रा. पापानगर हा बेकायदेशिरपणे गावठी कट्टा घेऊन फिरत असताना पोलिसांनी त्याला अटक केली. यावेळी त्याकडून पोलिसांनी एक गावठी कट्टा जप्त केला आहे. याबाबत बाजारपेठ पोलिस ठाण्यात आर्म अॅक्ट नुसार गुन्हा दाखल झाला आहे.
सईद शेख अमीर शेख हा जुन्या नगरपालिका इमारतीसमोर गावठी कट्टा घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. उपअधीक्षक गजानन राठोड, पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. युवराज नागरुत, पोलीस नाईक रवींद्र बिºहाडे, किशोर महाजन, यासिन पिंजारी, विकास सातदिवे, ईश्वर भालेराव, श्रीकृष्ण देशमुख, प्रशांत परदेशी, अक्षय चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेत संशयित आरोपी सईद शेख याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला १५ हजार रुपये किंमतीचा एक लोखंडी गावटी कट्टा जप्त करण्यात आला. तपास पो.नाईक रविंद्र बिºहाडे करीत आहेत.