भुसावळ -मुंबई पॅसेंजर पुन्हा चार दिवसांसाठी रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 16:44 IST2018-10-26T16:42:07+5:302018-10-26T16:44:32+5:30
मध्य रेल्वेतील इगतपुरी येथे इंटरलॉकिंग पॅनलसह यार्ड रिमोल्डिंगच्या कामासाठी विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक घेण्यात आला आहे.

भुसावळ -मुंबई पॅसेंजर पुन्हा चार दिवसांसाठी रद्द
भुसावळ : मध्य रेल्वेतील इगतपुरी येथे इंटरलॉकिंग पॅनलसह यार्ड रिमोल्डिंगच्या कामासाठी विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक घेण्यात आला आहे. यासाठी भुसावळ- मुंबई पॅसेंजर ही गाडी पुन्हा ३० आॅक्टोबरपर्यंत रद्द करण्यात आली आहे. दुसरीकडे पुणे- भुसावळ हुतात्मा एक्स्प्रेसच्या मार्गात बदल करण्यात आला आहे तर काही गाड्या उशिराने धावतील.
याआधी भुसावळ-मुंबई पॅसेंजर ही गाडी २३ ते २६ या दरम्यान रद्द होती. आता ती २६ ते ३० या दरम्यान रद्द असेल. भुसावल- पुणे हुतात्मा एक्स्प्रेस (क्र. ११०२५/२६) ही गाडी २६ ते ३० आॅक्टोबर या दरम्यान मनमाड -दौंड मार्गे वळविण्यात आली आहे. परतीच्या प्रवासातही याच मार्गाने येईल.
आता सणासुदीच्या दिवसांमध्ये या गाड्या रद्द झाल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होणार असून, रेल्वे प्रशासनाने लवकर प्रवाशांच्या दृष्टीने आपली कामे पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.