मुक्ताईनगर येथे भारिप-बहुजन महासंघाचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 19:26 IST2018-10-15T19:25:56+5:302018-10-15T19:26:40+5:30
मुक्ताईनगर तालुका दुष्काळ जाहीर करावा, मुस्लीम, धनगर आणि मराठा समाजाला तत्काळ आरक्षण द्यावे यासह विविध मागण्यांकरिता तालुका भारिप बहुजन महासंघातर्फे सोमवारी दुपारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

मुक्ताईनगर येथे भारिप-बहुजन महासंघाचा मोर्चा
मुक्ताईनगर, जि.जळगाव : मुक्ताईनगर तालुका दुष्काळ जाहीर करावा, मुस्लीम, धनगर आणि मराठा समाजाला तत्काळ आरक्षण द्यावे यासह विविध मागण्यांकरिता तालुका भारिप बहुजन महासंघातर्फे सोमवारी दुपारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, मुक्ताईनगर तालुका दुष्काळी जाहीर करावा, मुक्ताईनगर तालुक्यातील टोकरे कोळी समाजातील अनेक लोकांकडे जातवैधता प्रमाणपत्र आहे, त्यांना गावपातळीवर संस्थांमध्ये नोकऱ्यात प्राधान्य मिळावे, दाखले नसलेल्यांना आडकाठी न आणता जातीचे दाखले देण्यात यावे, धनगर समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करून तत्काळ आरक्षण देण्यात यावे, मुस्लीम समाजाला सच्चर कमिटीच्या शिफारसी लागू कराव्यात, मराठा समाजास तत्काळ आरक्षण लागू करून त्यांना त्याचा लाभ देण्यात यावा, मुक्ताईनगर तालुक्यातील दलित वस्ती अल्पसंख्याक निधी इतरत्र ठिकाणी खर्च करण्यात येत आहे. तो दलित वस्ती अल्पसंख्याक वस्तीमध्ये खर्च करण्यात यावा आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. शहरातील प्रवर्तन चौक येथून निघालेला मोर्चा तहसील कार्यालय पोहोचला.
या वेळी मोर्चामध्ये तालुकाध्यक्ष संजय कांडेलकर, पक्ष निरीक्षक भाऊ वसतकर, जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, सचिव दिनेश इखारे, जिल्हा उपाध्यक्ष माधान गवई, जिल्हा मार्गदर्शक विश्वनाथ मोरे, तालुका युवक अध्यक्ष संजय धनले, अध्यक्ष मुकुंदा सपकाळे, सुरेश तायडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.