भरधाव आयशर घरात घुसला, अंघोळ करणारा तरुण जागीच ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2022 12:05 IST2022-04-09T12:04:50+5:302022-04-09T12:05:32+5:30

सम्राट दादाराव इंगळे (१९) असे ठार झालेल्या तरुणाचे तर नीलेश इंगळे हा जखमी झाला आहे

Bhardhaw Eicher broke into the house, killing the young man taking a bath | भरधाव आयशर घरात घुसला, अंघोळ करणारा तरुण जागीच ठार

भरधाव आयशर घरात घुसला, अंघोळ करणारा तरुण जागीच ठार

भुसावळ जि. जळगाव : भरधाव आयशर गाडी रस्त्याच्या बाजूला असलेल्या घरात घुसल्याने हमाली काम करणारा तरुण जागीच ठार झाला आहे. तर दुसरा जखमी झाल्याची थरारक घटना शनिवारी सकाळी १०.२० वाजता यावल रोडवरील रमाई नगरात घडली. 

सम्राट दादाराव इंगळे (१९) असे ठार झालेल्या तरुणाचे तर नीलेश इंगळे हा जखमी झाला आहे. सम्राट हा सकाळी अंघोळ करीत होता. त्याचवेळी भरधाव आयशर त्याच्या घरात घुसली. त्यात सम्राट हा ठार झाला. आयशरचालकाने साकेगाव ते भुसावळ दरम्यान पाच ते सहा मोटारसायकल स्वारांना कट मारल्याचीही माहिती मिळाली. याप्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून अधिक तपास सुरू आहे. 

Web Title: Bhardhaw Eicher broke into the house, killing the young man taking a bath