रेल्वेतून पडून भादलीचा इसम ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 12:29 IST2018-10-31T12:28:49+5:302018-10-31T12:29:27+5:30

डोक्याला जबर मार

Bhadli's death killed by train | रेल्वेतून पडून भादलीचा इसम ठार

रेल्वेतून पडून भादलीचा इसम ठार

जळगाव : भुसावळ येथून भावाच्या घरून रेल्वेने येत असताना रेल्वेतून पडून दीपक खंडू नारखेडे (४५, रा. भादली) हे ठार झाले. ही घटना मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, भादली येथील शेतकरी दीपक नारखेडे हे भुसावळ येथे आपल्या भावाकडे गेलेले होते. तेथून ते रेल्वेने जळगावकडे परत येत असताना महामार्गावर भादली वीज उपक्रेंद्रानजीक असलेल्या रेल्वे मार्गावर नारखेडे हे रेल्वेतून पडले. त्यात त्यांच्या डोक्याला जबर मार लागून उजवा पाय कापला गेला. ही घटना भादली गावात समजताच गावकरी व नातेवाईकांनी घटना स्थळी धाव घेतली व नारखेडे यांना जिल्हा रुग्णालयात हलविले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मयताच्या खिशात रेल्वेचे तिकीटही सापडले असल्याची माहिती मिळाली.
नारखेडे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

Web Title: Bhadli's death killed by train