शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

भडगाव तालुक्यात थंडीचा फटका : १०० एकरावरील बागायत बाधीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 17:50 IST

दुष्काळातही मोठ्या कष्टाने फुलविलेल्या केळी बागा मागील महिनाभरापासून पडलेल्या थंडीच्या कडाक्यात सापडल्या आहेत.

ठळक मुद्देबात्सरला केळीच्या सुकल्या बागाकेळी खोडाची पाने, पोंगे थंडीने सुकू लागलेकृषि विभागाने सुचविलेल्या उपाययोजना करुनही फारसा लाभ होत नसल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे.

खेडगाव, ता.भडगाव, जि.जळगाव : दुष्काळातही मोठ्या कष्टाने फुलविलेल्या केळी बागा मागील महिनाभरापासून पडलेल्या थंडीच्या कडाक्यात सापडल्या आहेत. बात्सर येथील गिरणाकाठालगत असलेल्या १०० एकरावरील अंदाजे एक लाख केळीखोडाचे पाने, पोंगे थंडीने अक्षरश: सुकत बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत.बात्सर येथील शेतकऱ्यांनी कृषीसहाय्यकास बोलावत १५ रोजी शिवारातील केळीबागांची दुर्दशा दाखवीत पंचनाम्याची व शासकीय मदतीची मागणी केली. यावेळी भास्कर भीमराव पाटील यांच्या बागेस प्रत्यक्ष भेट देऊन नुकसानीचा अंदाज घेण्यात आला. दरम्यान, बाधीत केळीउत्पादक शेतकºयांनी कृषि विभागाकडे नुकसानीसंदर्भात अर्ज देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.गिरणेला पिण्यासाठी सुटणाºया आवर्तनाचा लाभ नदीकाठावरील विहिरींना होतो. दुष्काळ असतानाही शेतकºयांनी ठिबक आदी नियोजनातून पाण्याचा काटकसरीने वापर करीत केळीबागा फुलवल्यात. मागील महिन्यापासून थंडीचा कहर होत बागा आपोआप पिवळ्या पडत करपल्या आहेत. पोंगेच सुकल्याने उत्पादनाच्या दृष्टीने केळीखोड निकामी होत आहे. तालुक्यात हा परिसर केळी उत्पादनात अग्रेसर आहे. मात्र या संकटाने शेतकरी हवालदील झाला आहे.केळीबागेभोवती शेकोट्या पेटविणे, पहाटे बागेस पाणी देणे, द्रवरुप खते देणे आदी कृषि विभागाने सुचविलेल्या उपाययोजना करुनही फारसा लाभ होत नसल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीBhadgaon भडगाव