शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

गाळेधारकांच्या साखळी उपोषणला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:22 IST

जळगाव : महापालिकेच्या मालकीच्या अव्यावसायिक मानल्या जाणाऱ्या १६ मार्केटमधील गाळेधारकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले ...

जळगाव : महापालिकेच्या मालकीच्या अव्यावसायिक मानल्या जाणाऱ्या १६ मार्केटमधील गाळेधारकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे. त्यात संघटनेचे अध्यक्ष डॉ. शांताराम सोनवणे यांच्यासह प्रमुख गाळेधारक मंगळवारी सकाळी पहिल्या टप्प्यात सहभागी झाले होते.

गाळेधारकांकडून महापालिकेने अवाजवी भाडेवसुली करू नये, या मागणीसाठी १६ व्यापारी संकुलतील व्यापारी एकत्र आले आहेत. त्यांच्या जळगाव शहर मनपा मार्केट गाळेधारक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्यात येत आहे. मंगळवारी त्याचा पहिला दिवस होता. त्यात सकाळी ९ वाजता आंदोलकांनी पिंप्राळा येथील एकमुखी दत्त मंदिरात दर्शन घेतले त्यानंतर सकाळी ११ वाजता साखळी उपोषणाला सुरुवात केली. त्यात पहिल्या टप्प्यात संघटनेचे अध्यक्ष डॉ. शांताराम सोन‌वणे, पांडुरंग काळे, राजस कोतवाल, तेजस देपुरा, युवराज वाघ हे सामील झाले. त्यांनी दुपारी २ पर्यंत उपोषण केले. त्यानंतर दुपारी २ वाजता संजय पाटील, पंकज मोमाया, वसीम कादरी, हेमंत परदेशी हे सहभागी झाले होते. तर सुरेश पाटील, रिजवान जहागीरदार, रमेश तलरेजा, संजय अमृतकर यांनीही हजेरी लावली.

बुधवारी वालेचा मार्केटमधील व्यापारी करणार उपोषण

गाळेधारक संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पहिल्या दिवशी आंदोलन केले. आता बुधवारपासून दर दिवशी एका मार्केटमधील गाळेधारक उपोषण करणार आहे. त्यात बुधवारी वालेचा मार्केटमधील गाळेधारक आंदोलन करतील. तसेच मागण्या मान्य न झाल्यास पुढे आंदोलनाचे स्वरूप बदलणार आहे. पुढे लवकरच थाळी बजाव आंदोलन, अर्धनग्न आंदोलन करण्याचा इशारादेखील गाळेधारकांनी दिला आहे.