वऱ्हाडावर मधमाशांचा हल्ला : १३ जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2019 21:16 IST2019-03-10T21:16:06+5:302019-03-10T21:16:29+5:30
लग्नानिमित्त शेतात आयोजित पुजेच्यावेळी मधमाशांनी हल्ला केल्याने वधूपित्यासह १३ वºहाडी जखमी झाल्याची घटना जळगावनजीक शिरसोली येथे रविवारी सकाळी घडली.

वऱ्हाडावर मधमाशांचा हल्ला : १३ जण जखमी
जळगाव : लग्नानिमित्त शेतात आयोजित पुजेच्यावेळी मधमाशांनी हल्ला केल्याने वधूपित्यासह १३ वºहाडी जखमी झाल्याची घटना जळगावनजीक शिरसोली येथे रविवारी सकाळी घडली.
शिरसोली येथील गोपाल चिंधु ताडे (बारी) यांची कन्या कुसुम ताडे हीचा विवाह यावल येथील योगेश बारी यांच्याशी १० रोजी दुपारी शिरसोली येथे होता. लग्नाच्या पंगतीच्या अगोदर शेतातील मुंजाबाच्या मंदिरात पूजेची परंपरा आहे. यासाठी सकाळी ९ वा.लग्न घरातील १५ - २० वºहाडी पूजेसाठी शेतात गेले होते. जवळच चिंचेच्या झाडावर मधमाशांचे मोहोळ बसलेले होते. मधमाशांनी त्यांच्यावर हल्ला चढविला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे व-हाडींची धावपळ उडाली. वाट मिळेल तिकडे जो तो पळत सुटला. या धावपळीत वधू पिता गोपाल बारी यांच्यासह सखुबाई आडबाल, किशोर बारी, विकास ताडे, माया बारी, वेदांत बारी यांच्यासह १३ जण जखमी झाले आहेत. या सर्वांवर गावातील डॉक्टरानी उपचार केले.