पाळीव कुत्र्याला जेवण दिले नाही म्हणून पत्नीला मारहाण; पतीविरूद्ध गुन्हा दाखल

By विलास.बारी | Updated: July 25, 2023 18:56 IST2023-07-25T18:55:49+5:302023-07-25T18:56:21+5:30

या घटनेत पत्नीच्या हाताला दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

beating his wife for not feeding the pet dog Case filed against husband | पाळीव कुत्र्याला जेवण दिले नाही म्हणून पत्नीला मारहाण; पतीविरूद्ध गुन्हा दाखल

पाळीव कुत्र्याला जेवण दिले नाही म्हणून पत्नीला मारहाण; पतीविरूद्ध गुन्हा दाखल

जळगाव : पाळीव कुत्र्याला जेवण दिले नाही म्हणून पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीविरूद्ध नशिरबाद पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत पत्नीच्या हाताला दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

आचल ज्ञानेश्वर नाथ (वय २०, रा.पेठ भाग, नशिराबाद) यांनी फिर्याद दिली आहे. दि.२३ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास फिर्यादी यांचा पती ज्ञानेश्वर दिलीप नाथ (वय २३) याने पाळीव कुत्र्याला जेवण दिले नाही या कारणावरून पत्नीसोबत वाद घालायला सुरुवात केली. वाद वाढत असताना फिर्यादी यांचे आई व वडिलांनी भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र ज्ञानेश्वर याने फिर्यादी व त्यांच्या आई-वडिलांना शिविगाळ करीत मारहाण केली. तसेच फिर्यादीच्या हातावर पाय ठेऊन जेवणाच्या फायबरच्या प्लेट फोडून दुखापत केली. याप्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 

Web Title: beating his wife for not feeding the pet dog Case filed against husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.