शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

कासोदा येथे बँकेतील गर्दी कमी होईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 3:37 PM

कासोदा येथे बँकेतील गर्दी कमी होत नसल्याचे चित्र कायम आहे.

ठळक मुद्देकोरोना काय करून घेणार?जनतेतून संतप्त सवाल

प्रमोद पाटील

कासोदा, ता.एरंडोल : येथे एकच राष्ट्रीयकृत बॅंक आहे, पण दररोज या बॅंकेत गर्दीचे रेकार्ड मोडले जात आहे. कोरोनाची मोठी भीती असल्यावरदेखील स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लोकांना मोठ्या गर्दीत तासन्‌तास थांबावे लागते. येथे सेंट्रल बॅंकेतील गर्दी कमी करण्यासाठी कोणी काही प्रयत्न करणार का,  असा संतप्त सवाल जनतेतून विचारला जात आहे.एरंडोल तालुक्यातील सर्वात मोठे गाव कासोदा आहे. ४०हजारांच्या पुढे लोकसंख्या आहे. सुमारे २०-२५ खेडी या गावाला लागून आहेत. या सर्वांचा कासोदा येथील सेंट्रल बॅंकेशी संबंध येतो. कोणत्याही सरकारी योजेनेचा लाभ या बॅंकेत येतो. विद्यार्थ्यांना मिळणारे दोन-तीनशे रुपये घेण्यासाठीही गरीब पालकांची येथेच गर्दी होत असते. अशा अनेक योजनांमधून येणारे पैसे घेण्यासाठी याच बॅंकेत यावे लागते, त्यामुळे दररोज येथे तोबा गर्दी होत असते, सुरक्षा रक्षक, क्लर्क, उपव्यवस्थापक, कृषी अधिकारी, शिपाई ही पदे गेली अनेक वर्षे रिक्त आहेत. वादावादी, शिवीगाळ, नंतर पोलिसांना पाचारण  हे अगदी नित्याचेच झाले आहे. या गावात अजून एखाद्या बॅंकेची शाखा उघडावी, अशी मागणी येथील जनतेतून होत आहे. ४५ हजार खाती आहेत. शासकीय योजनांचे पैसे व इतर कामांसाठी येथे गर्दी होते. याआधी फक्त दोनच कर्मचारी होते. मार्च आहे म्हणून एक कर्मचारी सध्या आला आहे. गर्दीमुळे वेतागलेले ग्राहक व महिला ग्राहक  शिवीगाळदेखील करतात. मोठा वाद झाल्यानंतर पोलिसांना बोलवावे लागते. हे तर नित्याचेच आहे. वरिष्ठांना कर्मचाऱ्यांबाबत अनेकदा मागणी केली, पण कुणीही लक्ष देत नाही.-राजीव शर्मा, व्यवस्थापक सेंट्रल बँक, कासोदा, ता.एरंडोल

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याErandolएरंडोल