गोंडगाव बालिका हत्येप्रकरणी पाचोऱ्यात बंद, निषेध रॅली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2023 12:12 IST2023-08-07T12:12:44+5:302023-08-07T12:12:56+5:30

या घटनेच्या निषेधार्थ पाचोरा शहरात सोमवारी बंद पाळण्यात येत आहे.

Bandh, protest rally in Pachora in case of Gondgaon girl child murder | गोंडगाव बालिका हत्येप्रकरणी पाचोऱ्यात बंद, निषेध रॅली

गोंडगाव बालिका हत्येप्रकरणी पाचोऱ्यात बंद, निषेध रॅली

महेश कौंडिण्य

पाचोरा (जि.जळगाव) : गोंडगाव (ता. भडगाव) येथील सात वर्षीय बालिकेवर अत्याचार व हत्या करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ पाचोरा शहरात सोमवारी बंद पाळण्यात येत आहे. सकाळी निषेध रॅली काढण्यात आली. 

 या रॅलीमध्ये सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संस्था यांचे पदाधिकारी  तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. रॕलीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौकातून झाली.  तिथून देशमुख वाडी,  आठवडी बाजार, जामनेर रोड  या मार्गाने रॕली काढण्यात आली. 

 यावेळी पाचोरा शहरातील व्यापाऱ्यांनी उस्फूर्तपणे बंद पाळला. या रॕलीत आमदार किशोर पाटील, शिवसेनेच्या वैशाली सुर्यवंशी आदी सहभागी झाले होते.

Web Title: Bandh, protest rally in Pachora in case of Gondgaon girl child murder

टॅग्स :Jalgaonजळगाव