शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

कमी खर्चात केळीचे पीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 12:20 PM

विकास पाटील यांनी केला गोमूत्र व शेणखताचा वापर

ठळक मुद्देचार लाख उत्पन्न मिळण्याची आशाकेळीला शेणखत अन् गोमूत्र

अशोक परदेशी / आॅनलाईन लोकमतभडगाव, जि. जळगाव, दि. २२ - भडगाव तालुक्यातील वाडे येथील विकास नारायण पाटील या शेतकºयाने कष्ट अन् मेहनतीने विकास साधला आहे़ त्यांनी केळी पिकात लिंबू या आंतरपिकाची लागवड केली़ पाटील यांचे एकूण साडेतीन एकर शेतीचे बागायती क्षेत्र आहे़ डिसेंबर २०१६ मध्ये त्यांनी आंबे मोहोर केळी पिकाचे बेणे लागवड केली होती़ दीड एकर क्षेत्रात ५ बाय ५ अंतरावर २४०० खोडांची लागवड केली़ तसेच या केळी कांदे बागेत आंतरपीक म्हणून २० बाय २० अंतरावर १७० लिंबू रोपांची लागवड केली़केळी पिकात लिंबू हे आंतरपीक घेतले़ केळी पिकाला गोमूत्र अन् शेणखत देऊन कमी खर्चात जास्त उत्पन्न दीड एकर क्षेत्रात घेतले आहे़ केळी पिकाचे आतापर्यंत सव्वातीन लाखाचे उत्पन्न हाती मिळविले आहे़ चार लाखांपर्यंत उत्पन्न मिळण्याची आशा आहे़केळीला शेणखत अन् गोमूत्रशेत जमिनीच्या आंतर मशागतीचे काम करून केळी व लिंबू बागेला ठिबक सिंचनद्बारा पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले़ या शेतात केळी पीक लागवडीपूर्वी गायी, म्हशी व बैल अशी आठ जनावरे बसवून शेत शेणखत आणि गोमूत्राने रंगविण्यात आले़ शेती व्यवसायासोबतच त्यांनी जनावरे पालन करून दुग्धव्यवसायही जोपासून ठेवला आहे़ लागवडीनंतर केळी पिकाला टोपलीभर शेणखत सुरुवातीला एकदा प्रतिखोड टाकले़ लागवडीनंतर दर रविवारी केळी ठिबक सिंचनाद्वारे २५ लीटर गोमूत्राचाही नित्याने डोस दिला़ केळी बागेची वेळोवेळी आंतरमशागत केली़या दरम्यान त्यांनी रासायनिक खते वापरण्याचे टाळले़ तसेच त्यांनी सुरुवातीला केवळ एकवेळा खोडअळीच्या नियंत्रणासाठी एक कीडनाशक वापरले़ त्याव्यतिरिक्त त्यांना पुन्हा कोणतेही कीटकनाशक किंवा बुरशीनाशक वापरण्याची गरज पडली नाही़ त्यांनी केवळ शेणखत, गोमूत्र आणि पाण्याचे चांगले नियोजन केले़ कांदेबाग आणि लिंबूच्या झाडांनी बाग चांगली बहरली. ७ ते ८ महिन्यात केळी बागेची निसवण सुरू झाली़ १८ ते २० याप्रमाणे केळी घडांची सरासरी रास साकारली़ २४०० पैकी आतापर्यंत २००० केळी घडांची कटाई झाली़ यासाठी एकूण खर्च ३० हजार इतकाच झाला़ तर ८०० ते ९०० प्रती क्विंटल केळी पिकाला भाव मिळाला़चार लाख उत्पन्न मिळण्याची आशाकेळीचे बागाचे आतापर्यंत सव्वातीन लाखांचे उत्पन्न आले असूऩ अजूनही उर्वरित केळी मालालाही चांगला दर मिळून उत्पन्न मिळण्याची पाटील यांना आशा आहे़ विकास पाटील यांनी केळी पिकासह लिंबू बाग फुलविण्याचा यशस्वी प्रयोग कमी खर्चात जास्त उत्पन्न असा साकारला आहे़ पुढे लिंबूचा बागही तयार होऊन लाखोंचे उत्पन्न काढण्याचे नियोजन सुरू आहे़ शेतीत अहोरात्र काम करायचे मजुरी खर्चही वाचवायचा रासायनिक खते न वापरता गोमूत्र व शेणखताचा वापर करून गुणवत्तापूर्ण उत्पन्न काढणारे विकास पाटील समाधानी आहेत़

टॅग्स :Jalgaonजळगाव