००००००००००
न्यू इंग्लिश मीडियम स्कूल
न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षक दिनाचे महत्व ऑनलाइनद्वारे सांगण्यात आले. तसेच मुख्याध्यापक योगेश चौधरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांसह पालकांचा समावेश होता.
००००००००००
चांदसरकर विद्यामंदिर
गिरिजाबाई नथ्थुशेठ चांदसरकर प्राथमिक विद्यामंदिर येथे विद्यार्थ्यांना ऑनलाईनद्वारे शिक्षक दिनाचे महत्व पटवून देण्यात आले. त्यानंतर डॉ. राधाकृष्णन यांच्या जीवन कार्याची माहिती देण्यात आली. याप्रसंगी मुख्याध्यापक शाम ठाकरे, सीमा वैजापूरकर, एस.डी. भिरूड आदींची उपस्थिती होती.
०००००००००००
जय दुर्गा विद्यालय
मेहरूण येथील जय दुर्गा प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात प्रतिमा पूजन ज्येष्ठ शिक्षिका ज्योती पाटील व मुख्याध्यापक सागर कोल्हे यांच्याहस्ते करण्यात आले. नंतर विद्यार्थ्यांसाठी निबंध, वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
०००००००००
रत्ना जैन विद्यालय
रत्ना जैन प्राथमिक विद्यालयात मुख्याध्यापिका आशा साळुंखे यांच्याहस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर शिक्षकांचा सत्कार करुन कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. शेवटी शिक्षक दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगण्यात आले.
०००००००००
भाऊसाहेब लाठी विद्यालय
भाऊसाहेब काशिनाथ लाठी विद्यामंदिरात शाळेचे मुख्याध्यापक ग.के.नाईक यांच्याहस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. त्यानंतर चैताली वाघ यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवन कार्याची माहिती दिली. सूत्रसंचालन माया पानपाटील यांनी केले तर, आभार माधुरी पाटील यांनी मानले.
००००००००००
आर.आर. विद्यालय
आर.आर. विद्यालयात शिक्षक दिन साजरा करण्यात आला. सुरुवातीला उपमुख्याध्यापक डी. टी. पाटील यांच्याहस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी शिक्षिका कल्पना माळी, सी.एन.पाटील, डी.बी.पांढरे, व्ही.एम.ढाके, एस.एन.चौधरी, एल.पी.तायडे, ए.एन.सपकाळे, जे.एम.पाटील, अंजली पाटील, जगदीश चव्हाण आदींची उपस्थिती होती.