खराब हवामानाचा फटका, विमानसेवा पुन्हा एकदा रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 22:13 IST2019-10-22T22:12:31+5:302019-10-22T22:13:08+5:30
गैरसोय

खराब हवामानाचा फटका, विमानसेवा पुन्हा एकदा रद्द
जळगाव : गेल्या महिन्यात सुरु झालेल्या विमानसेवेला सुरुवातीपासूनच कधी पाऊस तर कधी खराब हवामानाचा फटका बसत आहे. अनेकवेळा ही विमानसेवा रद्द झाली आहे. मंगळवारी पुन्हा वेळापत्रकानुसार सकाळी ९. ३० ला अहमदाबादहून जळगावच्या दिशेने विमान निघणार होते. मात्र, अचावक वातावरण खराब वातावरण निर्माण झाल्यामुळे ही अहमदाबादहूनच रद्द झााल्याचे ट्रू जेटच्या सूत्रांनी सांगितले.
आतापर्यंत तीनदा सेवा रद्द
विमानसेवा सुरु झाल्यानंतर पहिल्याच आठवड्यात मुंबईतील पावसामुळे जळगावला विमान आलेच नव्हते. त्यानंतर पुन्हा गेल्या महिन्यात खराब हवामानामुळे मुंबईवरुन येणारे विमान, जळगावला न थांबता परस्पर अहमदाबादला गेले होते. तर आता मंगळवारी पुन्हा खराब हवामानामुळे अहमदाबादहून जळगावला विमान आलेच नाही.