वरखेडी येथे माता-पालक सभेत जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 16:14 IST2020-01-31T16:13:43+5:302020-01-31T16:14:31+5:30
जिल्हा परिषदेच्या येथील केंद्रीय प्राथमिक शाळेत माता-पालक सभा अंतर्गत महिलांचा हळदीकुंकू कार्यक्रम घेण्यात आला.

वरखेडी येथे माता-पालक सभेत जनजागृती
ठळक मुद्देहळदी-कुंकू व स्त्री जनजागृती कार्यक्रमचांगला-वाईट स्पर्शभाव याविषयी दिली माहिती
वरखेडी, ता.पाचोरा, जि.जळगाव : जिल्हा परिषदेच्या येथील केंद्रीय प्राथमिक शाळेत माता-पालक सभा अंतर्गत महिलांचा हळदीकुंकू कार्यक्रम घेण्यात आला. यात बेटी बचाव बेटी पढाव, पास्को कायद्याविषयी माहिती व स्त्रियांबाबत चांगला-वाईट स्पर्शभाव याविषयी सखोल माहिती देण्यात आली व तशा प्रकारची चलचित्र फित दाखवण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.रंजना भावसार होत्या. मुख्याध्यापक ईश्वर ठोंबरे, प्रभारी केंद्रप्रमुख राहुल पाटील शिक्षक उपस्थित होते.
सूत्रसंचालन वंदना सोनवणे, प्रास्ताविक उज्वला परदेशी तर आभार प्रदर्शन कविता कदम यांनी केले.