शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगावला प्राणायाम करून योगाचा जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चाळीसगाव : कोरोनाच्या सावटातही सुरक्षित अंतरात सोमवारी प्रसन्न सकाळी जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

चाळीसगाव : कोरोनाच्या सावटातही सुरक्षित अंतरात सोमवारी प्रसन्न सकाळी जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. बहुतांश शाळांमध्ये शिक्षकांनी योगासने करताना प्राणायामही केला. ऑनलाइनही योगासने झाली.

पोस्टात टपाल शिक्क्याचे अनावरण

जागतिक योग दिनानिमित्त पोस्ट कार्यालयात ऑनलाइन कार्यक्रमात टपाल शिक्क्याचे अनावरण सहायक डाक अधीक्षक एन. एस. जगदाळे यांच्या हस्ते झाले. यावेळी योग शिक्षक गणेश महाजन यांनी कर्मचाऱ्यांकडून योगासने करून घेतली. शहरी व ग्रामीण भागातील पोस्टमन यांच्यासह १८९ कर्मचारी सहभागी झाले होते. प्रमुख अतिथी म्हणून एस. ई. बडगुजर यांची उपस्थिती होती. यशस्वितेसाठी मनोज करंकाळ यांनी सहकार्य केले.

व्ही. एच. पटेल विद्यालयात योग जागर

व्ही. एच. पटेल प्राथमिक विद्यालयात सकाळी ७.३० वाजता शिक्षकांनी सुरक्षित अंतर पाळून योगासने व प्राणायाम केला. मुख्याध्यापक भगवान शिंगाडे यांनी योग व भारत यांचे उद्बोधन करताना जागतिक स्तरावर योगाचे महत्त्व कसे आहे, याबाबत माहिती दिली. योग शिक्षक सुभाष पिंगळे यांनी योगासने करताना शिक्षकांना मार्गदर्शन केले. एक तास योगाभ्यास करण्यात आला.

जि. प. शिक्षकांचा ऑनलाइन योग

जागतिक योग दिनानिमित्त पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने ऑनलाइन सोहळ्याचे आयोजन केले होते. यात तालुक्यातील जिल्हा परिषदेसह खासगी अनुदानित प्राथमिक शाळा, नगर परिषद, उर्दू शाळांमधील शिक्षकही सहभागी झाले होते. योग शिक्षकांनी मार्गदर्शन केले. गटशिक्षणाधिकारी विलास भोई यांनी प्रास्ताविकात ‘योग आणि शरीरसुदृढता’ यावर मौलिक उद्‌बोधन केले.

सम्राट विद्यालयात ऑनलाइन योगाभ्यास

सम्राट विद्यालयात योग दिन ऑनलाइन पद्धतीने साजरा करण्यात आला. याप्रसंगी शर्मा, व्ही. के. गायकवाड व वाय. एस. कामडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष जे. ए. खलाने उपस्थित होते. मुख्याध्यापिका एस. डी. महाजन व सर्व शिक्षक उपस्थित होते.

सर्व शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी योग सराव केला. दररोज योगसाधना करून जीवन सुखी ठेवू या, असा सर्वांनी निर्धार केला.

योग वर्गात ५२ साधकांचा सहभाग

शेट नारायण बंकट वाचनालयात गेली ४४ वर्षे अखंडपणे सुरू असलेल्या योग वर्गात सोमवारी ५२ साधकांनी नेहमीप्रमाणे आपली योगसाधना केली. यानंतर प्राणायाम व प्रार्थना घेण्यात आली. योगाचार्य वसंतराव चंद्रात्रे व त्यांच्या पत्नी मीनाक्षी चंद्रात्रे हा योग वर्ग मोफत घेतात. योग वर्गाचे हे यंदाचे ४५वे वर्ष सुरू आहे.

===Photopath===

210621\21jal_1_21062021_12.jpg

===Caption===

चाळीसगाव येथील सम्राट अशोक प्राथमिक विद्यालयात योगासने करताना मुख्याध्यापक व शिक्षक वृंद. (छाया : जिजाबराव वाघ)