दरवाजा उघडताच भावाला दिसला बहिणीचा मृतदेह, रामेश्वर कॉलनीमध्ये तरुणीची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2024 23:42 IST2024-02-17T23:41:49+5:302024-02-17T23:42:30+5:30
बहीण कुठे आहे म्हणून भावाने घराचा दरवाजा लोटताच त्याला बहिण गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली.

दरवाजा उघडताच भावाला दिसला बहिणीचा मृतदेह, रामेश्वर कॉलनीमध्ये तरुणीची आत्महत्या
जळगाव : घरातील सर्व सदस्य बाहेर गेलेले असताना विशाखा शालिक पवार (१७, रा. रामेश्वर कॉलनी) या तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवार, १७ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सहा वाजता उघडकीस आली. बहीण कुठे आहे म्हणून भावाने घराचा दरवाजा लोटताच त्याला बहिण गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली.
रामेश्वर कॉलनीमध्ये पवार कुटुंबीय एका शाळा परिसरात वॉचमनचे काम करून त्याच ठिकाणी असलेल्या एका खोलीमध्ये राहते. शाळेत काम करण्यासह दिवसा मोलमजुरी करणाऱ्या शालिक पवार यांच्याकडे दुपारी शिक्षकांनी शाळा बंद झाल्यानंतर चावी दिली. त्यानंतर पवार व त्यांची पत्नी कामासाठी बाहेर निघून गेले. त्यादरम्यान घरी एकटीच असलेल्या विशाखा पवार या मुलीने खोलीचा दरवाजा लोटून त्याला केवळ दगड लावला. त्यानंतर तिने खोलीमध्ये गळफास घेतला.
बहीण कुठे आहे म्हणून भाऊ तिचा शोध घेत असताना दरवाजाला कडी नसल्याने त्याने तो लोटताच त्याला विशाखा ही गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली. आक्रोश करत तो बाहेर आला. त्यावेळी आजूबाजूच्या नागरिकांच्या मदतीने विशाखाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तिला मयत घोषित केले.