शहरं
Join us  
Trending Stories
1
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
2
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
3
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
4
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
5
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
6
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
7
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
8
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
9
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
10
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
11
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
12
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
13
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
14
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
15
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
16
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
17
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
18
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
19
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
20
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
Daily Top 2Weekly Top 5

गुरुनानक नगरात दोन गटात वाद उफाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:57 IST

जळगाव : गुरुनानक नगरात रविवारी दुपारी तीन वाजता दुचाकीचा कट लागल्याचे निमित्त होऊन दोन गटात तुफान वाद उफाळून आले. ...

जळगाव : गुरुनानक नगरात रविवारी दुपारी तीन वाजता दुचाकीचा कट लागल्याचे निमित्त होऊन दोन गटात तुफान वाद उफाळून आले. त्यात सोनू भगवान सारवान (२५) व नीलेश नरेश हंसकर (१९) व बालण्णा लिंगण्णा गवळी सर्व रा.गुरुनानक नगर हे तीन जण जखमी झाले आहेत. दोघांवर जिल्हा रुग्णालयात तर गवळी याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुनानक नगरातील गवळी व सारवान गटात काही दिवसांपूर्वी वाद झाले होते. याच वादाच्या कारणावरून रविवारी दुचाकीचा कट लागल्याच्या कारणावरून दोन्ही गट समोरासमोर आले. लोखंडी रॉड घेऊन आलेल्या दहा ते पंधरा जणांच्या टोळीने सोनू व नीलेश या दोघांवर हल्ला केला. त्यात डोक्याला गंभीर दुखापत झाली. या गटानेही केलेल्या हल्ल्यात बालण्णा गवळी जखमी झाला. या वादाच्यावेळी दोन्ही गटाकडून जमाव जमला होता. पोलिसांनी तातडीने जखमींना वेगवेगळ्या वाहनातून वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल केले. दोघांना जिल्हा रुग्णालयात दाखल केल्याने तेथे मोठा जमाव जमला होता. सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा, पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे, उपनिरीक्षक अमोल कवडे, दिनेशसिंग पाटील, मुकुंद गंगावणे, कांबळे यांनी जमावाला पांगवून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. उशिरापर्यंत घटनेचे मूळ कारण स्पष्ट झालेले नव्हते. सोनू व नीलेश जबाब देण्याच्या परिस्थितीत नसल्याने कारण गुलदस्त्याच राहिले. दरम्यान, सोनू हा पोलिसांच्या रेकॉर्डवर असल्याची माहिती पोलिसांनी दिली.