शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

पकडलेल्या गायींना खावटी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 19:53 IST

अवैध वाहतुकीत पकडलेल्या पाच गायींना संबंधित व्यापाऱ्याने रोज प्रत्येकी ७५ रुपये खावटी द्यावी, असा निकाल पाचोरा न्यायालयाने दिला आहे.

ठळक मुद्देपाचोरा न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल.गोसेवक ॲड. शर्मा यांनी केली होती याचिका दाखल.

लोकमत न्यूज नेटवर्क

पाचोरा : अवैध वाहतुकीत पकडलेल्या पाच गायींना संबंधित व्यापाऱ्याने रोज प्रत्येकी ७५ रुपये खावटी द्यावी, असा निकाल पाचोरा येथील न्या. एफ. सिद्दीकी यांनी दिला आहे.  या गायी सध्या आरवे येथील गोशाळेत आहेत. 

एका वाहनातून गायींची वाहतूक केली जात असल्याची माहिती गोरक्षा समिती सदस्य हेमंत गुरव याने पोलिसांना दिली.  यावरुन हे वाहन पाचोरा पोलिसांनी जप्त केले.

त्यानंतर या पाच  गायींना आरवे येथील गोपाळकृष्ण शर्मा यांच्या गोशाळेत दाखल  करण्यात आले. या गायींच्या पालन पोषणासाठी  त्यांना खावटी मिळावी म्हणून पाचोरा येथील गोसेवक ॲड. चंद्रकांत शर्मा यांनी पाचोरा न्यायालयात  अपील दाखल केले. पाचोरा येथील  न्या. एफ. सिद्दीकी यांनी हे अपील मान्य करीत पाच गायींना प्रत्येकी प्रतिदिवस रु ७५ प्रमाणे खावटी व्यापारी जावेद खालिद कुरेशी याने गोशाळेस देण्याचा आदेश दिला.दरम्यान, खावटीची रक्कम आणखी वाढवून मिळावी, यासाठी  ॲड. शर्मा जळगाव येथील सेशन कोर्टात अपील दाखल केले आहे.  त्यात गायींच्या पालन पोषणासाठी प्रत्येक गायीमागे  प्रति दिन ३०० रुपये खावटी मिळावी, अशी मागणी केली आहे. 

टॅग्स :JalgaonजळगावPachoraपाचोराCourtन्यायालयOrder orderआदेश केणेcowगाय