शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
3
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
4
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
19
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
20
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत

जळगाव जिल्ह्यातील १८ पोलीस उपनिरीक्षकांची पुन्हा हवालदार, जमादारपदी नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 11:05 PM

हवालदार ते सहायक पोलीस उपनिरीक्षकांना पोलीस उपनिरीक्षकपदी तात्पुरती पदोन्नती दिलेल्या राज्यातील दीड हजार कर्मचा-यांना त्यांच्या मुळ पदावर जाण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. या निर्णयाचा फटका जिल्ह्यातील १८ उपनिरीक्षकांना बसला आहे. फौजदाराची टोपी, काठी व कमरेला रिव्हॉल्वर लावून फिरणा-या या अधिका-यांना मुळ पदावर पाठविल्यामुळे एक प्रकारे शासनाने अपमानच केल्याची भावनी या अधिका-यांमध्ये निर्माण झाली आहे.

ठळक मुद्दे शासनाकडून पदावनत   राज्यातील दीड हजार कर्मचा-यांची निराशा शासन अपमानित करीत असल्याची भावना

आॅनलाईन लोकमतजळगाव दि, २२:  हवालदार ते सहायक पोलीस उपनिरीक्षकांना पोलीस उपनिरीक्षकपदी तात्पुरती पदोन्नती दिलेल्या राज्यातील दीड हजार कर्मचा-यांना त्यांच्या मुळ पदावर जाण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. या निर्णयाचा फटका जिल्ह्यातील १८ उपनिरीक्षकांना बसला आहे. फौजदाराची टोपी, काठी व कमरेला रिव्हॉल्वर लावून फिरणा-या या अधिका-यांना मुळ पदावर पाठविल्यामुळे एक प्रकारे शासनाने अपमानच केल्याची भावनी या अधिका-यांमध्ये निर्माण झाली आहे.आवश्यक व तातडीची सेवा म्हणून पोलीस दलातील रिक्त असलेल्या पदावर पात्र असलेल्या हवालदार ते सहायक उपनिरीक्षकांना दर तीन महिन्यासाठी शासनाने उपनिरीक्षक पदावर पदोन्नती केली होती. दर तीन महिन्यांनी या कर्मचा-यांना मुदतवाढ देण्यात येत होती. जिल्ह्यातील १९ जणांना दोन ते तीन वर्षापासून मुदत वाढ मिळत होती. दरम्यान, यातील अनेक जण निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत तर जळगाव उपअधीक्षक कार्यालयातील अशोक वानखेडे हे दोन महिन्यापूर्वीच निवृत्त झाले आहेत. तरी देखील त्यांचे नाव या १८ जणांच्या यादीत आहे.या अधिका-यांना केले पदावनत गिरधर वेडू निकम (जिल्हा पेठ), अशोक विश्वनाथ वानखेडे (पोलीस उपअधीक्षक कार्यालय, जळगाव), प्रकाश सखाराम इंगळे (स्थानिक गुन्हे शाखा), मिलिंद आत्माराम इंगळे (मुख्यालय), फकीरखा रमजानखा तडवी (सावदा), संजय सदाशिव पंजे (चाळीसगाव शहर), शैला प्रकाश पाचपांडे (बाजारपेठ, भुसावळ), प्रकाश भास्कर बरडे (भुसावळ बाजार पेठ), राजेश देवराम वणीकर (शहर वाहतूक शाखा, भुसावळ), नेताजी पंडित वंजारी (रावेर),सुरेंद्र सुभानराव इंगळे (मुख्यालय), सुरेश माणिकराव वैद्य (भुसावळ तालुका), सतीश सुकलाल जोशी (शहर वाहतूक शाखा, जळगाव), राजू सदाशिव पंजे (मुख्यालय), अ.गफ्फार शेख हैदर शेख (जिल्हा पेठ), प्रकाश गणसिंग पाटील (जळगाव तालुका), अरुण गणेश जोशी (मुख्यालय) व अंबादास नारायण पाथरवट (बोदवड) यांचा समावेश आहे.

टॅग्स :JalgaonजळगावCrimeगुन्हा