जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी २८ डिसेंबरपर्यंत करता येणार अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 19:50 IST2020-12-15T19:49:47+5:302020-12-15T19:50:44+5:30
जळगाव : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात येणाऱ्या जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यानुसार २८ डिसेंबरपर्यंत ...

जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी २८ डिसेंबरपर्यंत करता येणार अर्ज
जळगाव : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात येणाऱ्या जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यानुसार २८ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येईल.
गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कारासाठी १ जुलै २०१० ते ३० जून २०२० या कालावधीतील कामगिरी ग्राह्य धरली जाणार आहे. गुणवंत खेळाडू पुरस्कार एक महिला खेळाडू, एक पुरुष खेळाडू, एक दिव्यांग खेळाडू यांना थेट पुरस्कार देण्यात येईल. याकरिता १ जुलै २०१५ ते ३० जून २०१० या कालावधीतील कामगिरी ग्राह्य धरली जाईल.
अशी आहे प्रक्रिया...
ऑनलाइन अर्ज भरण्याचा कालावधी १४ ते २८ डिसेंबरपर्यंत आहे. अर्जदाराने ऑनलाइन हार्ड कॉपी कार्यालयात सादर करण्याचा २८ डिसेंबरपर्यंत असून, ऑनलाइन अर्ज भरण्याची वेबसाइट Jalgaonsports.in अशी आहे. ऑनलाइन अर्ज भरण्याच्या अधिक माहितीकरिता सुजाता गुल्हाने यांच्याशी संपर्क साधवा, असे आवाहन करण्यात आले आहे.