शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
2
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
3
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
4
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
5
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
6
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
7
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
8
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
9
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
10
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
11
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
12
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
13
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
14
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
15
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
16
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
17
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात
18
७१% चं रेकॉर्डब्रेकिंग इनक्रिमेंट! 'हे' आहेत भारतातील IT क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणारे CEO; मिळणार १५४ कोटी सॅलरी
19
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
20
वय वर्ष ८०, तरीही फिट! दिलीप प्रभावळकरांना स्वत:च्या फिटनेसचं आश्चर्य, म्हणाले- "एकदा ५ कुत्रे माझ्या लागले तेव्हा..."

पुतळा विटंबनेनंतर समतानगरात संताप! एक जण ताब्यात : जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणारा मोर्चा माघारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2023 14:30 IST

१९८२ मध्ये स्थापन केलेल्या या पुतळ्याची विटंबना झाल्याचा प्रकार शनिवारी सकाळी सहा वाजता उजेडात आला. त्यानंतर या भागातील शेकडो समाजबांधव एकवटले.

जळगाव : येथील समतानगरात असलेल्या राष्ट्रमहापुरुषाच्या पुतळ्याची विटंबना केल्याचा प्रकार शनिवारी सकाळी उजेडात आला. या घटनेनंतर संतप्त झालेल्या जमावाचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर जात असतानाच पोलिसांनी त्यांना रोखले आणि एक जण ताब्यात घेतल्याची माहिती देत कठोर कारवाईचे आश्वासन दिल्याने मोर्चेकरी माघारी परतले.

१९८२ मध्ये स्थापन केलेल्या या पुतळ्याची विटंबना झाल्याचा प्रकार शनिवारी सकाळी सहा वाजता उजेडात आला. त्यानंतर या भागातील शेकडो समाजबांधव एकवटले. ही घटना कळताच अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, डीवाय.एस.पी.संदीप गावीत, रामानंद पोलीस स्टेशनच्या निरीक्षक शिल्पा पाटील यांच्यासह पोलिसांचा ताफा घटनास्थळी धडकला. पोलिसांनी शांततेचे आवाहन केले. मात्र जमावाने आरोपीला अटक करुन त्याच्यावर गंभीर स्वरुपाची कारवाई करण्यासाठी आग्रह धरला. त्यासाठी जमाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्यादिशेने निघाला. काव्यरत्नावली चौकात हा मोर्चा आल्यावर पोलीस अधीक्षक एम.राजकुमार मोर्चेकऱ्यांना सामोरे गेले.

कठोर कारवाई आश्वासनएम.रामकुमार यांनी एका संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती यावेळी मार्चेकऱ्यांना दिली. याप्रकरणी चौकशी सुरु असून संशयित आरोपी हा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला आहे. त्याच्यावर गंभीर स्वरुपाची कारवाई करु, असे आश्वासन दिले. त्यानंतर मोर्चेकरी माघारी परतले.

पुतळ्याचे शुद्धीकरणआमदार सुरेश भोळे यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच राष्ट्रपुरुषांचे पूजन करुन त्यांनी जमावाला शांत केले. त्यानंतर रिपाइंचे महानगराध्यक्ष अनील अडकमोल, सचीन अडकमोल, प्रताप बनसोडे, दिलीप सपकाळे, मुकूंद सपकाळे, सोनू आढाळे, किशोर जाधव,  अजय अडकमोल, शारदा अडकमोल, उज्ज्वला अडकमोल, अनील लोंढे, गौतम सरदार, दादाराव अडकमोल, किरण अडकमोल, विक्की नन्नवरे, सागर सपकाळे, कामिनी अडकमोल, मनीषा सपकाळे, मनीषा बाविस्कर, अलका ढिवरे, शोभा साळवे, हिराबाई नन्नवरे, लता आढाळे आदींनी पुतळ्याचे शुद्धीकरण केले आणि पूजाविधी करुन पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. दरम्यान, रामानंद नगर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीकडे कसून चौकशी सुरु आहे. स्वत: पोलीस अधीक्षकांनी या आरोपीकडे चौकशी केली. या प्रकरणात अन्य कुणाचा सहभाग आहे किंवा नाही, याचाही तपास सुरु आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव