शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

आमोदे येथे शालकाची मेहुण्याला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2017 00:30 IST

बहिणीला नांदवण्याचे कारण : पाच जणांविरुद्ध गुन्हा

शिरपूर : तालुक्यातील आमोदे येथे शालकाने त्याच्या मेहुण्याला चाकूचा धाक दाखवून 20 हजार रुपयांच्या रोकडसह गळ्यातील 2 तोळे वजनाची सोन्याची साखळी हिसकावून नेल्याची घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली आहे. ही घटना बहिणीला नांदविण्याचा निर्णय न झाल्याने घडली आहे.  शालकाने चक्क त्याच्या मेहुण्यावर चाकूहल्ला करून त्यांना जखमी केले आहे. 15 रोजी दुपारी 12़30 वाजेच्या सुमारास ही घटना आमोदे गावात घडली़ रमेश भोजूसिंग राजपूत (रा़आमोदे, ता. शिरपूर)  हे घराच्या ओटय़ावर उभे होते. त्याचवेळी  त्यांचा शालक दीपक सुभाषसिंग गिरासे (रा़दोंडाईचा, ता. शिंदखेडा) व इतर 5 जण तेथे आले.  त्यांनी दीपक यांचा मेहुणा रमेश राजपूत यांना बहिणीला नांदविण्याचा निर्णय लावून टाका, असे म्हणत मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यात रमेश राजपूत यांच्या गळ्यातील 60 हजार रुपये किमतीची 2 तोळे वजनाची सोनसाखळी व मागील खिशातील 20 हजार रुपये रोख असे एकूण 80 हजारांचा ऐवज जबरदस्तीने हिसकावून नेला़ या हाणामारीत रमेश राजपूत यांच्या डोक्याजवळ व कानाला चाकू लागल्यामुळे ते जखमी झाले आहेत.  त्यांना तातडीने शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल़े त्यांनी दिलेल्या जबाबावरून शिरपूर पोलिस ठाण्यात संशयित आरोपी दीपक गिरासेसह इतर 5 जणांविरोधात भादंवि कलम 395, 324, 141, 147, 148, 149, 504, 506 प्रमाणे दरोडय़ाचा गुन्हा नोंदविण्यात आला आह़ेभर दुपारी आमोदे गावात ही घटना घडल्यामुळे गावात काही काळ तणावाचे वातावरण होते. रमेश राजपूत यांना मारहाण करून आरोपी गेल्यानंतर रमेश यांच्या निवासस्थानाकडे ग्रामस्थांची गर्दी झाली.