शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
"निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
3
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
4
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांचे वादग्रस्त विधान
5
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
6
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
7
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
8
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
9
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
10
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
11
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
12
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
13
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
14
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान
15
PHOTOS : मोकळे केस अन् घायाळ करणाऱ्या अदा; धनश्री वर्माचा बोल्ड लूक!
16
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
17
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
18
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
19
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
20
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी

पाचोरा येथे आगीत रुग्णवाहिका जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2021 4:46 PM

टायर फुटले व आगीने भडका घेत रुग्णवाहिकेच्या आतील भाग क्षणार्धात आगीच्या भक्ष्यस्थानी जात मोठा भडका उडाला. 

ठळक मुद्दे ग्रामीण रुग्णालयाची नादुरुद्त रुग्णवाहिका होती पडूनमोठी दुर्घटना टळली

पाचोरा : येथील ग्रामीण रुग्णालयाची नादुरुस्त रुग्णवाहिका रविवारी सकाळी अकराच्या सुमारास अचानक जळून खाक झाल्याची घटना ग्रामीण रुग्णालय परिसरात घडली आहे. पेटत्या कचऱ्याने पेट घेतल्याने ही रुग्णवाहिका आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. याबाबत माहिती अशी की, येथील ग्रामीण रुग्णालयाची १०२ ही रुग्णवाहिका (एमएच-१९-एम-१२३) ही गाडी बरेच दिवसांपासून नादुरुस्त अवस्थेत रुग्णालयाच्या आवारात उभी होती. या ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले होते. रविवारी सकाळी हा कचरा सफाई कर्मचाऱ्याने पेटविला.  तेव्हा उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेकडे कचऱ्याने पेट घेत सुरुवातीला रुग्णवाहिच्या चाकास आग लागली. त्यात टायर फुटले व आगीने भडका घेत रुग्णवाहिकेच्या आतील भाग क्षणार्धात आगीच्या भक्ष्यस्थानी जात मोठा भडका उडाला. तत्काळ नगरपालिकेच्या अग्निशमन बंब पाचारण करून आग आटोक्यात आणली. यावेळी रुग्णवाहिकेच्या संपूर्ण भाग जळून खाक झाला. रुग्णालयाचे वैद्यकीयअधिकारी डॉ.अमित साळुंखे हे हजर झाले.दरम्यान, रुग्णालय परिसरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य असून कचऱ्याचे ढीग साचले आहेत. यासंदर्भात वेळोवेळी तक्रारी करून वृत्त प्रसिद्ध होऊनही पालिकेला जाग आली नाही. या परिसरात अद्यापही घाणीचे साम्राज्य आहे. या ग्रामीण रुग्णालयात कोविड सेंटर असून, ३० रुग्ण उपचारार्थ दाखल आहेत. त्यांना ऑक्सिजन पुरविण्यात आला आहे. याच ठिकाणी ऑक्सिजन सिलेंडरदेखील आहे. आग रात्रीच्या वेळी लागली असती अथवा आगीच्या लोळनी रुग्णालयाला स्पर्श केला असता तर  मोठी दुर्घटना घडली असती, मात्र सुदैवाने सकाळच्या वेळी ही घटना घडल्याने मोठा अनर्थ टळला.