अमळनेरात दोघांनी घेतला गळफास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 22:54 IST2021-03-14T22:53:29+5:302021-03-14T22:54:11+5:30
अमळनेर तालुक्यात घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांनी गळफास घेऊन आपला जीवनप्रवास संपविला आहे.

अमळनेरात दोघांनी घेतला गळफास
लोकमत न्यूज नेटवर्क
अमळनेर : तालुक्यात घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांनी गळफास घेऊन आपला जीवनप्रवास संपविला आहे. पत्नीच्या आजाराच्या चिंतेत टाकरखेडा येथील प्रकाश भिला कोळी (५५) यांनी १४ रोजी दुपारी २ वाजता विरोबा मंदिराजवळ असलेल्या निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. रामकृष्ण दत्तात्रय कोळी यांच्या खबरीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, तपास हेडकॉन्स्टेबल मेघराज महाजन करीत आहेत.
अमळनेर शहरातील सानेनगर भागातील विवाहित तरुण सुधाम रोहिदास पाटील(२७) याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि.१४ रोजी दुपारच्या सुमारास घडली. सानेनगरमधील महादेव मंदिरात हरिनाम सप्ताहाच्या समाप्तीनिमित्त महाप्रसादाचा कार्यक्रम होता. तेथे या युवकाची आई प्रसाद घेण्यासाठी गेली होती. त्या प्रसाद घेऊन परत येत नाहीत, तोपर्यंत सुधाम पाटील यांनी घरातच गळफास घेतला.
दरम्यान, हा युवक विवाहित असून, पत्नी माहेरी गेलेली आहे. सुधाम हा एकटाच वृद्ध आईकडे राहत होता. आधी विप्रोमध्ये कंत्राटी कामगार म्हणून जात असताना आता ब्रेक मिळाल्याने मिस्तरी काम तो करीत होता.
त्याच्यापश्चात वृद्ध आई, विवाहित बहीण असा परिवार असून, अमळनेर पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बेरोजगारी व मानसिक तणावातून त्याने हे कृत्य केल्याचे सांगितले जात आहे. तपास हेडकॉन्स्टेबल सुनील हटकर करीत आहेत.