आॅनलाईन लोकमतचोपडा, दि.४ : अमळनेर शहराला उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा म्हणून हतनूर धरणातील पाणी कालव्याद्वारे अकुलखेडा येथून आउटलेटद्वारा चहार्डी ता. चोपडा येथील चंपावती नदीमार्फत तापी नदीत सोडण्यात आले आहे. यामुळे पेयजलाचा प्रश्न काही अंशी सुटण्यास मदत होणार आहे.दरम्यान, आवर्तनातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे मात्र चहार्डी आणि परिसरात नदीत पावसाचे पुराचे पाणी आल्यासारखे पाणी वाहू लागल्याने गुरांढोरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न दहाबारा दिवसांसाठी सुटला आहे. तसेच हे आवर्तन पाच दिवस चालणार असल्याने जमिनीत काही अंशी पाणी झिरपून नदीच्या आजूबाजूच्या शेतातील शेतकºयांच्या कुपनलिकांना पाणी वाढणार आहे.तसेच नदीच्या आजूबाजूला शेती असलेल्या शेतकºयांनी विद्युत पंपाद्वारे पाणी आपल्या पिकांना दिल्याने पिके तजेलदार झाली आहेत. या आवर्तनामुळे परिसरात काही अंशी गारवा निर्माण झाला आहे. सदर पाणी दि. २८ फेब्रुवारी पासून सोडणे सुरू असून दररोज ५०० क्यूसेस इतके पाणी कालव्यात सोडले जात असल्याचे हतनूर कालवा येथील कार्यालयातून कळविण्यात आले आहे. अजूनही दोन ते तीन दिवस पाणी सुरू राहणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
अमळनेरसाठी हतनूर धरणातून पाण्याचे आवर्तन सोडले...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 22:12 IST
अमळनेर शहरातील नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा उन्हाळ्यातही सुरळीत राहावा यासाठी हतनूर धरणाच्या कालव्यातून चहार्डी येथील चंपावती नदीत आणि तेथून तापी नदीत पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले आहे.
अमळनेरसाठी हतनूर धरणातून पाण्याचे आवर्तन सोडले...!
ठळक मुद्देपाच दिवसापर्यंत सोडले जाणार पाणीनदी परिसरातील कुपनलिका झाल्या जीवंत पिकांना पाणी मिळाल्याने बनली तजेलदार