शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

अमळनेर भाजपतील गटबाजीमुळे जाणवतेय प्रचारात उणीव...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 13:16 IST

खडसे-महाजन गटाकडून कुरघोड्यांचे राजकारण होण्याची भिती

संजय पाटील अमळनेर : जळगाव लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी बदलल्यानंतर आणि अमळनेरच्या राड्यानंतर भाजपची गटबाजी अधिकच जाणवू लागली असून, प्रचारात कार्यकर्त्यांची उणीवदेखील जाणवू लागली आहे. पुन्हा एकदा जलसंपदा मंत्री गिरीश होऊ शकतात, असे जाणवू लागले आहेतालुक्यात जिल्हाध्यक्ष उदय वाघ समर्थक आणि इतर सर्व गटांचे एकत्र गट असे दोनच गट असून, जळगाव लोकसभेची उमेदवारी देण्यासाठी आरएसएसच्या छुप्या गटाने स्मिता वाघ आणि नंतर ए.टी. पाटील असे प्राधान्य दिले होते. स्मिता वाघ यांना उमेदवारी देताना गिरीश महाजन यांचा स्पष्ट विरोध होता असे बोलले जाते आणि ए.टी. पाटील, आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार डॉ.बी.एस. पाटील यांनी कडाडून विरोध केल्यानंतर महाजन यांना आयती संधी चालून आली आणि उन्मेष पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. त्याचे परिणामदेखील जाणवले. अमळनेरच्या बूथ मेळाव्यात उदय वाघ व समर्थकांनी माजी आमदार डॉ.बी.एस. पाटील यांनी स्मिता वाघ यांच्यावर केलेल्या टीकेचा बदला काढला. सभेत केलेल्या बदनामीकारक वृत्ताचे सभेतच उत्तर देण्यात आले.एकंदरीत, दोन्ही सभेतील प्रकारांबाबत वरिष्ठ नेत्यांनी मात्र त्यांनी तटस्थ भूमिका घेतल्याचे त्यांच्या वागण्यावरून असे दिसून आले. उमेदवार बदलताच महाराणा प्रताप चौकातील भाजप प्रचार कार्यालय अ‍ॅड.व्ही.आर. पाटील यांच्या निवासस्थानी नेण्यात आले. त्यामुळे पूर्वीच्या कार्यालयात स्मिता वाघ यांच्या नावाचे फलक कोपऱ्यात ठेवण्यात आले. गाद्या, खुर्च्या टेबल तसेच पडून असून, त्यावर धूळ जमली आहे. उदय वाघ आणि स्मिता वाघ प्रचार करणार असल्याचे म्हणत आहेत परंतु बूथ प्रमुख आणि यादी प्रमुख त्यांच्या ताब्यात आहेत आणि ते तळागाळातील कार्यकर्ते मात्र प्रचारास निघायला तयार नाहीत. तिकडे खडसे गटातील डॉ.बी.एस. पाटील आणि माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी यांनीही प्रचारास नकार दिला आहे. घटनेच्या अनुषंगाने कारवाईचे निमित्त दाखवून खडसे समर्थक प्रचारातून बाजूला होत असल्याचे जाणवत आहे तर पत्नीबद्दल अपशब्द वापरले म्हणून पती या नात्याने वाघ यांचे रक्त खवळणे साहजिक आहे असे काही नेते म्हणत आहेत.तर बी.एस.पाटील यांनी उमेदवारी मिळाली नाही तेव्हा एकनाथराव खडसे यांच्याविरोधात नाराजी व्यक्त करत अपक्ष उमेदवारी करून भाजपचे उमेदवार अनिल भाईदास पाटील यांना पराभूत करण्यात यशस्वी झाले होते व काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे त्यांच्याबाबत किती गांभिर्याने घ्यायचे याचीही चर्चा सुरू आहे.भाजप उमेदवाराचा प्रचार करणार असून, लवकरच सुरुवात करेल व २३ नंतर इतर मतदारसंघातदेखील प्रचाराला जाणार आहे. -उदय वाघ, जिल्हाध्यक्ष, भाजपविविध नेत्यांशी चर्चा करून जर तुम्हाला भाजप उमेदवार निवडून आणायचा असेल तर उदय वाघ यांच्यावर तत्काळ कारवाई करा, असे सांगितले होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. मी प्रचारात सहभागी होणार नाही.-सुभाष चौधरी, माजी नगराध्यक्ष, अमळनेरजोपर्यंत उदय वाघ यांच्यावर पक्ष कारवाई करत नाही तोपर्यंत प्रचारात उतरणार नाही. वरिष्ठांकडे तक्रारी केल्या आहेत.-डॉ.बी.एस.पाटील, माजी आमदार, अमळनेरमाझा आतेभाऊ वारला आहे. मी तिकडे आहे. आधी फिरलो. विधी आटोपल्यानंतर प्रचार करेल. -लालचंद सैनानी, माजी शहराध्यक्ष, अमळनेरमाझा मित्रपरिवार आणि मी स्वतंत्र प्रचार करेल. भाजपसोबत प्रचार करणार नाही. रावेर मतदारसंघातदेखील प्रचार करण्यासाठी जात आहे. -शिरीष चौधरी, भाजप सहयोगी आमदार.

टॅग्स :Jalgaonजळगाव