शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत? तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
9
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
10
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
11
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
12
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
14
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
15
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
16
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
17
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
18
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
19
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
20
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

अमळनेर बाजार समितीत १५ हजार क्विंटल धान्याची विक्रमी आवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2020 5:55 PM

१० दिवसांनंतर बाजार समितीने धान्य खरेदी सुरू करताच पहिल्याच दिवशी सुमारे १५ हजार क्विंटलची प्रचंड आवक झाली.

ठळक मुद्दे८०० वाहने शिस्तीत व कोरोना नियम पाळत खरेदीरोखीने पेमेंट मिळाल्याने शेतकरी समाधानी

संजय पाटीलअमळनेर, जि.जळगाव : तब्बल १० दिवसांनंतर बाजार समितीने धान्य खरेदी सुरू करताच पहिल्याच दिवशी सुमारे १५ हजार क्विंटलची प्रचंड आवक झाली. जळगाव जिल्ह्यासह अनेक तालुक्यातून शेतकऱ्यांनी आपला माल विक्रीस आणला होता. डिस्टन्सची काळजी घेत शिस्तीत मालाचा लिलाव करण्यात आला.शेतकऱ्यांचा रब्बी माल काढून घरात ठेवला होता. मात्र लॉकडाऊनमुळे पैसा नसल्याने शेतकरी हैराण झाले होते. अनधिकृत व्यापाºयांनी खेड्यांमध्ये जाऊन शेतकºयांचा गहू १२०० रुपये क्विंटल भावाने खरेदी करून लूट करीत होते म्हणून शेतकºयांनी बाजार समिती सुरू करण्याची मागणी केली होती. सकाळी साडेसात वाजेपासून बाजार समिती बाहेर बसंस्थानकपर्यंत एक कि.मी.ची रांग लागली होती. सभापती प्रफुल पाटील स्वत: प्रवेशद्वारावर थांबून एक वाहन सोबत चालक व्यतिरिक्त एकाच शेतकºयाला प्रवेश देत होते. बाजार समिती आवार फुल झाल्यानंतर शेतकी संघ जिनमध्ये वाहनांची सोय करण्यात आली. लोकडाऊनमुळे शेतकºयांच्या मालाची सुमारे ७०० ते ८०० वाहनांची गर्दी झाली होती.एरव्ही ११ वाजेला सुरू होणारा लिलाव व्यापारी, हमाल, मापाडी, गुमास्ता यांनी नऊला लिलाव सुरू केला. आवारात चार ठिकाणी हात धुवायला साबण व पाण्याच्या बादल्या ठेवल्या होत्या, तर कर्मचारी व व्यापारी यांच्याजवळ सॅनिटायझर उपलब्ध होते.क्विंटलमागे एक किलो कटती कापणे रद्द केल्यानंतर प्रथमच १५ हजार क्विंटल मालाची आवक झाली. गव्हाला १६०० ते १९००, हरभºयाला ४३०० ते ५५००, दादरला ३२०० ते ४१००, मक्याला १५०० ते १६०० व बाजरीला २२०० ते २५०० रुपये भाव मिळाल्याने व रोखीने पैसा मिळाल्याने शेतकरी आनंदी होते . एकाच दिवसात सुमारे साडेतीन कोटींची उलाढाल झाली.सभापती प्रफुल पाटील, संचालक पराग पाटील, विश्वास पाटील, भगवान कोळी, हरी वाणी, शंकर बितराई समक्ष थांबून गर्दी करणाºयांना बाहेर जाण्याविषयी सांगत होते. आमदार स्मिता वाघ, प्रांताधिकारी सीमा अहिरे, पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांनी भेट देऊन नियमांचे पालन व सोशल डिस्टन्सचे पालन होते की नाही याची पाहणी केली. कोरोनामुळे बाजार समितीच्या इतिहासात पहिल्यांदा शिस्तीत व वेळेत खरेदी झाल्याची प्रतिक्रिया व्यापाºयानी व्यक्त केली.भादली, तरसोद, धरणगाव, पाचोरा, चोपडा, एरंडोल, पारोळा, भडगाव, शिरपूर, शिंदखेडा, यावल, नरडाणा, बेटावद, धुळे आदी तालुके व परिसरातील शेतकºयांनी आपला माल विक्रीस आणला होता.शेतकºयांची लूट थांबून वेळीच त्यांचा माल विक्री होऊन त्यांच्या हातात लॉकडाऊनमध्ये देखील पैसा उपलब्ध व्हावा म्हणून परवानाधारक व्यापाºयांच्या बाजार समिती सुरू सहकार्याने करून रोखीने मोबदला देण्यात आला व कटती कापलेली नाही.-प्रफुल पाटील, सभापती बाजार समिती, अमळनेरबाजार समिती सुरू झाल्याने गावात १२०० रुपयाने विकला जाणारा गहू १७५५ रुपये क्विंटलने विकला गेला व रोख पैसे मिळाले.-महेश पाटील, शेतकरी 

टॅग्स :MarketबाजारAmalnerअमळनेर