माजी विद्यार्थिनींनी केले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2020 09:22 PM2020-02-05T21:22:27+5:302020-02-05T21:22:40+5:30

जळगाव - मेहरूण परिसरातील राज माध्यमिक विद्यालयात नुकतेच सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थिनींचा संवाद सत्राचे आयोजन करण्यात आले ...

 Alumni guide students | माजी विद्यार्थिनींनी केले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

माजी विद्यार्थिनींनी केले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

Next

जळगाव- मेहरूण परिसरातील राज माध्यमिक विद्यालयात नुकतेच सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थिनींचा संवाद सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी विद्यार्थिनींनी शाळेतील विद्यार्थ्यांशी मनसोक्त संवाद साधत त्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जयश्री महाजन होत्या़ कार्यक्रमाचे माजी विद्यार्थिनींच्याहस्ते उद्घाटन होवून कार्यक्रमाला प्रारंभ झाले. यावेळी आम्ही कसे घडलो यासह मुलांच्या जबाबदाऱ्या तसेच होणा-या चुका, ध्येय निश्चिती याबाबत माजी विद्यार्थिनींनी मार्गदर्शन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रश्नांचे विद्यार्थिनींनी त्यांना आलेल्या अनुभवाचे उदाहरण देवून उत्तरे दिली व विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले. नंतर शाळेतील आठवणींना उजाळा देण्यात आला. कार्यक्रमाला मोहिनी वानखेडे, वैशाली झाल्टे, दीपाली गवळे, तृप्ती तायडे या माजी विद्यार्थिनींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी.डी.नेहते यांनी केले तर आभार व्ही.डी.नेहते यांनी मानले़

 

Web Title:  Alumni guide students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.