महाविकास आघाडीचे तिन्ही टायर पंक्चर, अमित शाहांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2024 06:05 PM2024-03-05T18:05:28+5:302024-03-05T18:05:47+5:30

Amit Shah : विरोधक त्यांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री करण्यासाठी झटत आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तुमच्या भविष्यासाठी झटत असल्याचे अमित शाह यांनी सांगितले.

All three tires punctured by Mahavikas Aghadi, Amit Shah's attack | महाविकास आघाडीचे तिन्ही टायर पंक्चर, अमित शाहांचा हल्लाबोल

महाविकास आघाडीचे तिन्ही टायर पंक्चर, अमित शाहांचा हल्लाबोल

जळगाव : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यावर आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांचा हा दौरा महत्वाचा आहे. या दौऱ्यात अमित शाह यांची जळगावमध्ये जाहीर सभा पार पडली. यावेळी राज्यातील महाविकास आघाडीवर अमित शाह यांनी जोरदार हल्लाबोल केला. राज्यात ३ चाकाची महाविकास आघाडीची ऑटो चालते, तिचे तिन्ही टायर पंक्चर झाले आहेत, असे अमित शाह म्हणाले.

अमित शाह यांनी घराणेशाहीवरुन सोनिया गांधी, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावरही जोरदार निशाणा साधला. उद्धव ठाकरेंना आपला मुलाला मुख्यमंत्री करायचं आहे, शरद पवारांना सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करायचं आहे, असे म्हणत परिवारवादातून चालणारे विरोधी पक्ष हे लोकशाही मजबूत करू शकतात का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित युवकांना केला. 

विरोधक त्यांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री करण्यासाठी झटत आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तुमच्या भविष्यासाठी झटत असल्याचे अमित शाह यांनी सांगितले. राज्यात ३ चाकाची महाविकास आघाडीची ऑटो चालते, तिचे तिन्ही टायर पंक्चर झाले आहेत. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार चांगले काम करत आहेत. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सुविधा दिल्या. १ लाख मुलं डॉक्टर बनतील, असे अमित शाह म्हणाले.

आत्मनिर्भर आणि विकसित भारताचा निर्धार या निमित्ताने भाजपाकडून करण्यात येत आहे. भारत मातेला विश्वगुरुच्या स्थानावर पोचहविण्यासाठी भाजपाला साथ देण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित युवकांना केले. परिवारवादातून चालणारे विरोधी पक्ष हे लोकशाही मजबूत करू शकतात का? असा प्रश्न त्यांनी युवकांना केला. विरोधक त्यांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री करण्यासाठी झटत आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तुमच्या भविष्यासाठी झटत असल्याचे अमित शाह यांनी सांगितले.

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळात ११ व्या क्रमांकावर असलेली भारतीय अर्थव्यवस्था आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात ५ व्या क्रमांकावर पोहचली आहे. आगामी काळात देशाची अर्थव्यवस्था ही जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होईल, ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गॅरंटी असल्याचे अमित शाह यांनी सांगितले.

तुम्ही नोकरीला जाणार तिथे तुमचा बायोडाटा बघितला जाणार की नाही? मग पंतप्रधान बनविताना तुम्ही बायोडाटा बघणार की नाही बघणार? १० वर्षांचा अनुभव आणि पुढील २५ वर्षांचे व्हिजन आहे, असा नेता पुन्हा पुन्हा होत नाही. मुद्रा लोण दिले, स्टार्टअप दिले, डिजीटल व्यवहार झालेत, रेल्वे ट्रॅक बनविले, रोज गॅस सिलिंडर ५० हजार लोकांना दिले. गरिबीतून लोकांना बाहेर काढले. प्रत्येक घरात पाणी पोहोचण्याचे काम केले, असे अमित शाह यांनी सांगितले.

राम मंदिर आधी बनायला हवे होते की नाही? काशी मथुरा कोरिडोर बनायला हवे होते की नाही? असा सवाल करत काँग्रेसने मतांसाठी ७० वर्षे रामललाला टेन्टमध्ये ठेवले, असे अमित शहा म्हणाले तसेच, काश्मीर आपला हिस्सा आहे की नाही? ३७० कलम ७० वर्ष काँग्रेसने हटविले नाही. मोदींना दोनदा पंतप्रधान केले, त्यांनी ३७० कलम हटविले. पुलवामामध्ये आतंकवादी आले, 10 दिवसांत पाकिस्तानमध्ये जाऊन सर्जिकल स्टाईक केले. ही मोदी गॅरंटी आहे, असेही अमित शाह म्हणाले.

Web Title: All three tires punctured by Mahavikas Aghadi, Amit Shah's attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.