शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

अ‍ॅप करणार कोरोनाबाधीत रुग्णांपासून सतर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2020 1:37 PM

आरोग्य सेतू : उपयुक्त माहिती आणि हेल्पलाईनही सेवेला

मतीन शेख।लोकमत न्यूज नेटवर्कमुक्ताईनगर : कोरोना वायरसने जगभरात थैमान घातले आहे. देशात या आजारावर मात करण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहे, त्याचाच एक भाग म्हणून सुरक्षितता निर्माण करण्यासाठी आरोग्य सेतू हे मोबाईल अ‍ॅप केंद्र शासनाने लाँच केले आहे. लोकांना आरोग्य सेवांसोबत जोडणे आणि सुरक्षितता निर्माण करण्यासाठी साठी आरोग्य सेतू यामोबाईल अ‍ॅप माध्यमातून चक्क आपल्या ६ फूट अंतरावर गर्दीच्या ठिकाणी एखादा कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपल्याला सतर्क करणार आहे. फक्त अ‍ॅपसाठी ब्लु टूथ आणि जीपीएस सुरू ठेवावे लागणार आहे.सर्वसामान्य स्मार्ट फोन धारकांच्या माध्यमातून लोकांना सतर्क, जागृत आणि सुरक्षित ठेवण्या एक मोठे पाऊल आरोग्य सेतू अ‍ॅपच्या माध्यमातून उचलले आहे. हे एकप्रकारचे कॉम्प्रिहेन्सीव्ह कोविड-१९ ट्रॅकिंग अ‍ॅप आहे. करोनाविरोधातील लढाईत लोकांना आरोग्य सेवांशी जोडणं हा अ‍ॅपचा प्रमुख उद्देश आहे. सध्या हे अ‍ॅप अ‍ॅन्ड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. हे अ‍ॅप आपल्याला गूगल प्ले आणि अ‍ॅपल स्टोअर मधून डाऊनलोड करता येणार आहे.तर केंद्रा तर्फे स्वतंत्र लिंक चे मॅसेज देण्यात येत असून या लिंक द्वारेही हे मोबाईल एप डाउनलोड करता येते.आरोग्य सेतू अ‍ॅप हे सरकारनं आवश्यक आरोग्य सेवांना देशातील लोकांशी जोडण्यासाठी तयार केल्याची माहिती देखील प्रसारित करण्यात आली आहे. युझर्सना कोविड-१९ च्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय करावं आणि त्याच्याशी निगडीत सल्ले याद्वारे देण्यात येणार आहेत.६ फूट अंतरावरील कोरोना रुग्णाचे अलर्टब्लु टूथ वापर व जीपीएसद्वारे व्यक्तीचं रिअल टाईम लोकेशन ट्रॅक करत या अ‍ॅपद्वारे शासकीय दप्तरी नोंद असलेला करोनाग्रस्त व्यक्ती जवळ आल्यास हे अ‍ॅप ट्रॅक करणार आहे. सहा फूट अंतरापर्यंत हे अ‍ॅप ‘त्या’व्यक्तीला ट्रॅक करू शकतं. केंद्र सरकारकडे असलेल्या डेटाबेसचं अ‍ॅक्सेस या अ‍ॅपला मिळणार आहे. या अ‍ॅप मध्ये यम फोन क्रमांकाद्वारे रजिस्टर करावं लागणार आहे. त्यानंतर हे अ‍ॅप एक ओटीपी पाठवेल. त्यानंतर तुमचं नाव, वय तुम्ही बाहेर देशाचा प्रवास केला काय अशा प्रकारची माहिती भरावी लागणार आहे. जोपर्यंत मोबाईलचं लोकेशन ट्रॅकिंग सुरू आहे तोवर हे अ‍ॅप ट्रॅक करत राहणार आहे. तसंच तुम्हाला फोनचं ब्ल्यूटूथही सुरू ठेवावं लागणार आहे. शनिवारी सकाळ पर्यन्त अवघ्या काही तासात तब्बल २५ हजाराहून अधिक नागरिकांनी हे अ‍ॅप डाउनलोड केले आहे.११ भाषांमध्ये उपलब्धयामध्ये कोविड-१९ च्या ट्रॅकिंग व्यतिरिक्त अन्य फिचर्सही देण्यात आले आहेत. यात कोविड-१९ बाबतीतील माहिती आणि संरक्षणाचे उपायही सांगण्यात आले आहेत. तसंच नजीकच्या कोविड-१९ हेल्पसेंटरबाबतही माहिती देण्यात आली आहे. हे मराठी आणि हिंदी या भाषांसोबत ११ भाषांमध्ये उपलब्ध आहे.सेल्फ असेसमेंटया अ‍ॅप वर सेल्फ असेसमेंट या विभागातील प्रश्नावली चे उत्तर देतांना लगेच आपल्या ला एखाद्या तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून जणू आपली आरोग्य तपासणी झाल्याचा किंवा आरोग्या बाबत जागरूकता पाळण्याचा आनंद ही मिळतो.