जळगावात पूर्ववैमनस्यातून गटात हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 12:21 IST2018-07-30T12:21:07+5:302018-07-30T12:21:22+5:30

तरूण गंभीर जखमी

Agitated group in Jalgaon pre-eminent group | जळगावात पूर्ववैमनस्यातून गटात हाणामारी

जळगावात पूर्ववैमनस्यातून गटात हाणामारी

जळगाव : पूर्ववैमनस्यातून तांबापुरा परिसरातील सिकलकर वाड्यात रविवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली़ या घटनेत सुभाष निंबा जाधव (वय- २८ रा़ तांबापुरा) हा तरूण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहे़
सिकलकर वाड्यात ३० ते ४० तरूणांचा जमाव रात्री जमलेला होता़ त्यातील काही मद्यपी तरूणांनामध्ये जुन्या वादातून बाचाबाची झाली़ अखेर बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले़ दोन गट आमने-सामने येऊन जोरदार हाणामारी झाली़ घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी तीन ते चार तरूणांना ताब्यात घेतल्याचे समजते़ तर जखमी सुभाष जाधव यास रूग्णालयात पाठविले़ याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल होण्याचे काम सुरू होते़

Web Title: Agitated group in Jalgaon pre-eminent group