शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

उणं दुणं काढल्यानंतर दणाणतो परिसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 02:05 IST

प्रत्येक माणसाला कमी-अधिक प्रमाणात राग येतो, संताप येतो. राग व्यक्त करण्याच्या विविध पद्धती. हा प्रत्येकाचा स्वभाव. या लेखमालेतील तिसरा भाग लिहिताहेत अभ्यासक प्रिया सफळे...

१०. खुन्नस- हा तसा गंभीर प्रकाऱ इच्छित गोष्ट मिळाली नाही की व्यक्ती बेफाम होते़ डुख धरते़ विषारी साप, विंचू डुख धरतात म्हणे आणि दंश करून विष पसरवतात़ योग्य आणि तत्काळ उपचार न झाल्यास माणूस गतप्राण होऊ शकतो़ पण हे डुख धरणं माणसात आहे़ ते खुन्नस या प्रकारे एखादी सुंदर करिअरिस्ट तरुणी भविष्याची अनेक स्वप्ने पहात मित्र-मैत्रिणींसमवेत कॉलेजचे मोरपंखी जीवन जगत असते़तिच्यावर नजर ठेवणारा कुणी एक तरुण तिला त्रास देतो़ ती प्रतिसाद देत नाही, मग याची खुन्नस वाढत जाते आणि मग ही हिस्त्र व्यक्ती तिला एकटीला गाठून तिच्या देखण्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड टाकते. रॉकेल, पेट्रोल फेकते़ काडी लावते. अरे ही कसली खुन्नस? प्रेम तर नव्हेच नव्हे!जमीन-जुमला, पैशाचे व्यवहार, गावातील राजकारण, आंतरजातीय विवाह केला म्हणून असे विखारी लोक खुन्नस घेऊनच जगतात़ दुसºयाचं आयुष्य उद्ध्वस्त करून यांना काय मिळतं?११. आदळआपट- हा थोडा वेगळा प्रकार आहे़ यात व्यक्ती रागावली की, प्रत्येक काम आदळआपट करतच करते़ स्वयंपाकघरात ‘ती’चा राग अनावर झाला असेल तरी तिची कृती साधारण अशी असते़ समजा ती पोळ्या करीत असेल तर दणकन परात आपटेल, खाडकन कणकेचा डबा उघडेल़ भरर्कन परातीत पाणी ओतेल़ कणिक मळून परात आपटून पुढचा सगळा स्वयंपाक आदळआपट करतंच पूर्ण करेल़आॅफिसात कामाचा ताण, बॉसनं दिलेला त्रास, ‘तो’ घरात आदळआपट करून व्यक्त करेल,़ धाडकन गेट उघडेल, दणक्यात बाईक, स्कूटर, कार पार्क करेल, नॉनस्टॉप कॉलबेल वाजवेल. चपला, शूज पाय आपटतच काढेल आणि तो आॅफिसचा राग प्रत्येकावर आदळआपट करत, कांगावा करत व्यक्त करेल़१२. थयथयाट- ही कृती छोट्या मुलांमध्ये आणि कणभर जरी समोरचा चुकला असेल तरी मणभर थयथयाट करणाºया अनेक स्त्री-पुरुषांमध्ये हा रागप्रकार आढळतो़ स्थळ- खेळण्यांचं दुकाऩ़ आईबाबांसमवेत गोंडस तीन-चार वर्षांचं त्यांचं लाडकं बाळ. रंगीबेरंगी खेळण्यांचं आकर्षण अन् हातात घेतलेलं प्रत्येक खेळणं मला हवंच हा हट्ट खेळण्यांच्या किमती अव्वाच्या सव्वा. मग आईबाबा- अरे तू अजून लहान आहेस. हे छी...छी... हे घे..., ते घे... असं समजावणं आणि मग काय त्या चिमुरड्या-चिमुरडीचा थयथयाट. कुठून दुर्बुद्धी झाली अन् याला-हिला दुकानात आणलं, असा आई-बाबांचा अविर्भाव़न सांगता मोलकरीण तीन-चार दिवस घरी राहिली की बाईसाहेबांचा तिला पहाताच थयथयाट सुरू. असंख्य शब्दफेकींसोबतच तिची अडचण काय, आजारी होती का आणखी काही घटना घडली का? नाही, ती विचारपूसच नाही. घरचे इतर सदस्य आवरायचा प्रयत्न करतात, पण हा थयथयाट सुरू राहतो. तोंडाच्या पट्ट्यांसोबत अन् मग जेव्हा ती मोलकरीण म्हणते, ‘बरं, मग मी जाऊ? लावा दुसरी बाई कामाला’ तेव्हा हा थयथयाट थांबतो खट्टदिशी़१३. आकांडतांडव- या राग प्रकारातून व्यक्त होणारी कृती आजूबाजूचा माहोल बिघडवून टाकते़ एखादा कडक बॉस तो म्हणेल तीच पूर्व दिशा, हेकेखोर स्वभाव. कर्मचाऱ्यांकडून चूक झाली की हे लोक आकाशपाताळ एक करत आकांडतांडव करतात, आॅफिस डोक्यावर घेतात.नवा माणूस सुरुवातीला पार घाबरतो, पण मग हे तांडव त्याच्या परिचयाचं होऊन जातं. सासू-सुनेचं आकांडतांडव हाही एक जबरदस्त रागप्रकार आहे़ दोघींपैकी एक समजूतदार असेल तर हा प्रकार आढळत नाही़ पण दोघीही एकीपेक्षा एक असतील तर मात्र विचारूच नका. एकमेकींवर कुरघोही करायला टपलेल्या असतात. उणंदुणं सापडलं की आधी घर मग परिसर आकांडतांडवाने दणाणून सोडतात़ (क्रमश:)-प्रिया सफळे, जळगाव

टॅग्स :literatureसाहित्यJalgaonजळगाव