एकनाथ खडसेंना विधानपरिषदेची संधी; जळगावात समर्थकांनी फटाके फोडले, पेढेही वाटले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2022 14:30 IST2022-06-09T14:30:17+5:302022-06-09T14:30:23+5:30
दोन वर्षांपूर्वी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे यांना राजकीय पुनर्वसनाच्या दृष्टीने विधानपरिषदेची मोठी संधी मिळाली आहे.

एकनाथ खडसेंना विधानपरिषदेची संधी; जळगावात समर्थकांनी फटाके फोडले, पेढेही वाटले!
जळगाव- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर झाली आहे. खडसे यांनी आज दुपारी मुंबईत उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर जळगावात त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. राष्ट्रवादी कार्यालयाच्या बाहेर खडसे समर्थकांनी एकत्र येत फटाक्यांची आतषबाजी केली, तसेच नागरिकांना पेढेही वाटले.
दोन वर्षांपूर्वी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे यांना राजकीय पुनर्वसनाच्या दृष्टीने विधानपरिषदेची मोठी संधी मिळाली आहे. विधानपरिषदेसाठी खडसे यांचे नाव जाहीर झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने खऱ्या अर्थाने एकनाथ खडसे यांना न्याय दिला, अशी भावना यावेळी खडसे समर्थकांनी व्यक्त केली. भाजपने खडसेंना सतत डावलण्याचं काम केलं, पण राष्ट्रवादीत आल्यानंतर शरद पवारांनी खडसेंचं पुनर्वसन केलं, असेही जल्लोष करताना काही जण म्हणाले.