शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

मोबाइल व पैसे लुटल्यानंतर केली बँकेतून पैसे काढण्याची हिम्मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 21:36 IST

चौघा भामट्यांनी तरुणाला लुटले : खात्यावर पैसे नसल्याने काढला पळ

जळगाव : बसस्थानकापर्यंत लिफ्ट देण्याच्या बहाण्याने नितीन ज्ञानेश्वर बाविस्कर (१७, रा. कृष्णाजीनगर, अडावद, ता. चोपडा) या तरुणास चार भामट्यांनी मारहाण करून त्याचा मोबाइल हिसकावला. या तरुणाकडून आणखी पैसे पाहिजे असल्याने भामट्यांनी त्याला बँकेत नेले. खात्यात पैसे नसल्याने या भामट्यांनी बँकेतून पलायन केल्याची घटना शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नितीन बाविस्कर हा तरुण शुक्रवारी दुपारी एसटी बसने जळगावात आला. शिवाजी नगरात उतरल्यानंतर रेल्वे रूळ ओलांडून तो तहसील कार्यालयाजवळ आला होता. तेथे त्याने दुचाकीस्वार भामट्यास बसस्थानकाचा पत्ता विचारला. पत्ता न सांगता भामट्याने नितीनला लिफ्ट दिली. परंतु, त्याला बसस्थानकात न घेऊन जाता एका अज्ञातस्थळी नेले. तेथे भामट्याचे आणखी तीन साथीदार हजर होते. या चौघांनी नितीनला मारहाण करून त्याच्याजवळील १० हजार रुपयांचा मोबाइल व पाचशे रुपये काढून घेतले. भामट्यांनी आणखी काही आहे का? याची तपासणी केली असता नितीनच्या बॅगेतून स्टेट बँकेचे पासबुक मिळून आले. बँकेत किती रक्कम आहे याचीही विचारणा केली. खात्यात पैसे नसल्याचे नितीनने सांगितले. यानंतर भामट्यांनी पुन्हा नितीनला दुचाकीवर बसवून स्टेडियम समोरील स्टेट बँकेत आणले. त्याठिकाणी रितसर नितीनच्या पासबुकची एंट्री करून रक्कम तपासून घेतली. खात्यात पैसे नसल्याचे निष्पन्न झाल्यानंतर चारही भामट्यांनी बँकेतून पळ काढला. तत्पूर्वी त्यांनी नितीनला पोलिसात न जाण्याची धमकीही दिली. भामटे पळून गेल्यानंतर नितीनने शहर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली. त्यानुसार शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव