१५ वर्षांनंतर मुलाने घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, कुटुंबीयांसमोरच गोळ्या झाडून संपवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 15:26 IST2025-04-23T15:26:16+5:302025-04-23T15:26:39+5:30

राहुल याच्या वडिलांचा २०१० साली खून झाला होता.

After 15 years son takes revenge for fathers murder shoots a man dead in front of family | १५ वर्षांनंतर मुलाने घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, कुटुंबीयांसमोरच गोळ्या झाडून संपवलं

१५ वर्षांनंतर मुलाने घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, कुटुंबीयांसमोरच गोळ्या झाडून संपवलं

Jalgaon Crime: जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील सोनवदजवळील विहीर फाटा येथे पूर्ववैमनस्यातून एका व्यक्तीची कुटुंबीयांसमोरच गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची थरारक घटना मंगळवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. गोपाल सोमा मालचे असे मयत व्यक्तीचे नाव आहे. तर, राहुल सावंत असं संशयिताचे नाव आहे. राहुल याच्या वडिलांचा २०१० साली खून झाला होता. या खून खटल्यातून गोपाल मालचे यांची निर्दोष मुक्तता झाली होती.

कपाळाच्या मधोमध धरला नेम
मंगळवारी सायंकाळी गोपाल मालचे हे खामखेडे येथे साडू विनायक विक्रम ठाकरे यांना भेटण्यासाठी कुटुंबासह आले होते. त्यांना भेटून ते परत जात असताना राहुल याने त्यांना विहीर फाट्याजवळ गाठत त्यांची कार थांबवून गोळीबार केला. यात, गोपाल यांच्या कपाळाच्या मधोमध गोळी लागल्याने ते जागीच गतप्राण झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
 
घटनेनंतर आरोपी पोलिसात हजर
खुनाच्या घटनेनंतर संशयित आरोपी राहुल सावंत हा स्वतः धरणगाव पोलिस ठाण्यात हजर झाला व त्याने घटनेची माहिती दिली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत धरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Web Title: After 15 years son takes revenge for fathers murder shoots a man dead in front of family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.