शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

साहसी खेळांचा शिक्षणात समावेश व्हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 12:03 AM

उमेश झिरपे : गिर्यारोहणामुळे मुलांचा व्यक्तिमत्व विकास होतो

लोकमत मुलाखत-जळगाव : साहसी खेळांचा समावेश हा शिक्षण पद्धतीत झाल्यास त्यामुळे मुलांचा व्यक्तिमत्व विकासात वाढ होईल. गिर्यारोहण तसेच अन्य साहसी खेळ खेळणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यासाठी स्वतंत्र गुण द्यावेत, यामुळे साहसी खेळांचा विकास होईल, असे मत प्रसिद्ध गिर्यारोहक उमेश झिरपे यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.जळगावच्या आशा फाऊंडेशनने आयोजित केलेल्या व्याख्यानासाठी उमेश झिरपे हे जळगावला आले आहेत. त्यानिमित्ताने त्यांनी लोकमतशी विशेष चर्चा केली.झिरपे म्हणाले की,‘ जगभरात १४ आठ हजार मीटरपेक्षा जास्त उंचीची शिखरे सर करण्याचा आमचा मानस आहे. त्यातील सात शिखरे आम्ही सर देखील केली आहे. महाराष्ट्रातील सध्याची गिर्यारोहणाची स्थिती यावर बोलताना झिरपे म्हणाले की, महाराष्ट्रात सह्याद्रीच्या डोंगररागांमध्ये गिर्यारोहण आणि अ‍ॅडव्हेंचर टुरिझम सध्या वाढले आहे. या खेळांमध्ये सुरक्षितता अत्यंत महत्वाची असते. या क्षेत्रात देखील रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत, त्यासाठी प्रशिक्षीत व्यक्तींची गरज आहे. शासकीय पातळीवर देखील प्रयत्न सुरू आहेत.’ते पुढे म्हणाले की, गिर्यारोहण आणि अन्य साहसी खेळांमुळे मुलांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. शाळेत जसे संगीत, चित्रकला, इतर खेळांसाठी विद्यार्थ्यांना स्वतंत्र गुण दिले जातात, त्याप्रमाणेच गिर्यारोहण, पॅरासेलिंग, स्कुबा डायव्हिंग या साहसी खेळांना देखील स्वतंत्र गुण दिले जावे. त्याने या खेळांना प्रोत्साहन मिळेल. तसेच लहान वयात मुले सध्या मोबाईल आणि इंटरनेटकडे आकर्षित होत आहेत. त्यांच्यातील उर्जेचा योग्य वापर देखील होईल. लहान मुलांसाठी विविध साहसी खेळांच्या प्रशिक्षणाचे आयोजन ‘गिरीप्रेमी’ या संस्थेमार्फत केले जाते.’एव्हरेस्ट वीर उमेश झिरपे यांनी सांगितले की, लहान मुलांमध्ये या खेळांमुळे नेतृत्वगुण, संघ भावना वाढीस लागते. त्यांचा आत्मविश्वास वाढतो. विद्यार्थ्यांना लाईफ स्किल्सचे शिक्षणच यातून मिळते.’

कांचनजुंगा चढाईसाठी कठीण शिखरमाऊंट कांचनजुंगा हे जगातील तिसरे सर्वात उंच शिखर असले तरी हे शिखर मला चढाईसाठी कठीण वाटते. हा पर्वत चढताना दगड आणि बर्फातून मार्ग काढावा लागतो. तर ६० ते ७० अंशाच्या कोनात बेस कॅम्पपासून ११०० मीटर चढाई करावी लागते.त्यासाठी २४ तासांपेक्षा जास्त वेळ लागतो. प्रत्येक शिखर हे आव्हानात्मक असले तरी त्याचा वेगळेपणा असतो, असेही ते म्हणाले