दुचाकीच्या अपघातात प्रौढ ठार , नशिराबाद पुलाजवळील घटना

By सागर दुबे | Updated: May 2, 2023 20:53 IST2023-05-02T20:52:32+5:302023-05-02T20:53:00+5:30

रूग्णालयात नातेवाईकांची धाव

Adult killed in two-wheeler accident, incident near Nashirabad bridge | दुचाकीच्या अपघातात प्रौढ ठार , नशिराबाद पुलाजवळील घटना

दुचाकीच्या अपघातात प्रौढ ठार , नशिराबाद पुलाजवळील घटना

जळगाव :  नशिराबाद गावाजवळील पुलाजवळ झालेल्या दुचाकीच्या अपघातात दिलीप विश्वनाथ देवरे (५७, रामेश्वर कॉलनी) या प्रौढाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली. अपघातामध्ये दुचाकीचे नुकसान झाले असून सायंकाळी नातेवाईकांची जिल्हा रूग्णालयात गर्दी झाली होती.

दिलीप देवरे हे मंगळवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास नशिराबाद गावाजवळील पुलाजवळून जात होते. अचानक त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. यात त्यांना गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. काही नागरिकांनी त्यांना तत्काळ वाहनातून जिल्हा रूग्णालयात नेले. मात्र, वैद्यकीय अधिका-यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर सायंकाळी रूग्णालयात नातेवाईकांनी धाव घेतली होती. दरम्यान, अपघात कसा घडला याबाबत कोणतीही माहिती नव्हती. देवरे यांच्या आई कमलबाई, पत्नी जयाबाई, मुलगा गणेश आणि विवाहित मुलगी असा परिवार आहे.

Web Title: Adult killed in two-wheeler accident, incident near Nashirabad bridge