कचरा वेचणा-या प्रौढाचा धावत्या रेल्वेचा धक्का लागून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2020 21:07 IST2020-12-20T21:07:09+5:302020-12-20T21:07:26+5:30
जळगाव : धावत्या रेल्वेचा जोरदार धक्का लागल्याने बळीराम हिरामण खेरोटे (५८, रा़ नशिराबाद) या प्रौढाचा मृत्यू झाला. ही घटना ...

कचरा वेचणा-या प्रौढाचा धावत्या रेल्वेचा धक्का लागून मृत्यू
जळगाव : धावत्या रेल्वेचा जोरदार धक्का लागल्याने बळीराम हिरामण खेरोटे (५८, रा़ नशिराबाद) या प्रौढाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सायंकाळी ६ वाजता नशिराबाद-आसोदा दरम्यानातील रेल्वे रूळावर घडली. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
बळीराम खरोटे हे पत्नी व दोन मुलांसह नशिराबाद येथे वास्तव्यास होते़ हलाकीची परिस्थीती असल्यामुळे मिळेल ते काम करून कुटूंबियांचा उदरनिर्वाह करीत होते. तसेच ते रेल्वे रूळाच्या बाजूला पडलेल्या प्लॅस्टिकच्या रिकाम्या बाटल्या गोळा करण्याचे काम करायचे. शनिवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास नशिराबाद-आसोदा दरम्यान ते प्लॅस्टिकच्या बाटल्या उचलण्याचे काम करीत होते. सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास भुसावळकडून जळगावकडे भरधाव वेगाने येणार मालवाहू रेल्वेचा जोरदार धक्का त्यांना बसला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना ऐकायला कमी येत असल्याने हा अपघात झाल्याची माहिती मयत बळीराम खरोटे यांचा मुलागा भिमराव यांनी सांगितले. नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी सरलाबाई, भिमराव आणि पवन दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.