एनआरएमयू तथा इतर युनियनमधील पदाधिकाऱ्यांचा सीआरएमएस संघटनेत प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 02:48 PM2020-08-21T14:48:58+5:302020-08-21T14:50:16+5:30

सेंट्रल रेल्वे मजदूर संघ सीआरएमएसच्या जनरल शाखेची विशेष सभा २० आॅगस्ट रोजी झाली.

Admission of office bearers from NRMU and other unions to CRMS organization | एनआरएमयू तथा इतर युनियनमधील पदाधिकाऱ्यांचा सीआरएमएस संघटनेत प्रवेश

एनआरएमयू तथा इतर युनियनमधील पदाधिकाऱ्यांचा सीआरएमएस संघटनेत प्रवेश

Next
ठळक मुद्देभुसावळ येथे झाला सोहळाविविध पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

भुसावळ, जि.जळगाव : सेंट्रल रेल्वे मजदूर संघ सीआरएमएसच्या जनरल शाखेची विशेष सभा २० आॅगस्ट रोजी झाली. या सभेत मंडळ अध्यक्ष व्ही.के.समाधिया, मंडळ सचिव एस.बी.पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत एनआरएमयू तथा इतर युनियनमधील पदाधिकाºयांनी सीआरएमएसमध्ये जाहीर प्रवेश केला.
यामध्ये मुख्यत: अलका चौधरी नर्सिग मेट्रॉन, रामजी चिफ फार्मासिस्ट, कुंजबिहारी सी.एन.एस, उज्ज्वल करोसिया, जयदेव एच.आय. तथा अन्य सदस्यांना पुष्पहार, टोपी, कार्ड, पेन व डायरी देऊन स्वागत करण्यात आले.
व्ही.के.समाधिया, एस.बी.पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात येऊन सीआरएमएसमध्ये औपचारिक जाहीर प्रवेश करण्यात आला.
याप्रसंगी समाधिया, एम.एस.बी.पाटील, कुंदलता धुळ, अलका चौधरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रवेश कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाखा सचिव दीपक शर्मा, शाखाध्यक्ष पी.के.गुप्ता, मंडळ संघटक रायकवार यांनी नियोजन केले. यावेळी ए.के.तिवारी, रईसा बानो, ए.जी.सोनवणे, किरण बढे, ए.के.सिंह, सत्यमेव सिंह, नंदकिशोर, कुणाल निकम, सुभान गवळी, मुकेश यादव, सुरेश जैसवाल व जनरल शाखेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Admission of office bearers from NRMU and other unions to CRMS organization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.